पत्रकार असल्याचे सांगून घातला गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:39 AM2019-02-28T00:39:50+5:302019-02-28T00:40:48+5:30

स्वत:ला पत्रकार असल्याचे सांगून एका व्यक्तीने लकडगंज येथील मनपा झोन कार्यालयात तोडफोड करून गोंधळ घातला. इतकेच नव्हे तर झोनच्या सहायक अधीक्षकांना मारहाणही केली. याप्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The journalist said that the mess | पत्रकार असल्याचे सांगून घातला गोंधळ

पत्रकार असल्याचे सांगून घातला गोंधळ

Next
ठळक मुद्देगुन्हा दाखल : मनपा झोन कार्यालयात तोडफोड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वत:ला पत्रकार असल्याचे सांगून एका व्यक्तीने लकडगंज येथील मनपा झोन कार्यालयात तोडफोड करून गोंधळ घातला. इतकेच नव्हे तर झोनच्या सहायक अधीक्षकांना मारहाणही केली. याप्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंद्रमणी हौशिलाप्रसाद तिवारी (५८) रा. प्लॉट नं. १३६० देशपांडे ले-आऊट असे आरोपीचे नाव आहे. नरेंद्र बावनकर (५२) रा. न्यू डायमंडनगर असे फिर्यादीचे नाव आहे बावनकर हे महापालिकेच्या लकडगंज झोनमध्ये सहायक अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. बावनकर यांच्या तक्रारीनुसार मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजता बावनकर आपल्या कार्यालयात ड्युटीवर असताना आरोपी इंद्रमणी तिवारी तेथे आला त्याने स्वत:ला पत्रकार असल्याचे सांगितले. तसेच त्याने २००४ साली ७ हजार रुपये टॅक्स भरला होता. त्या रकमेच्या व्याजाची रक्कम तो परत मागू लागला यावर बावनकर यांनी लेखी अर्ज करण्याचा सल्ला दिला. परंतु तिवारी संतापला त्याने बावनकर व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. इतकेच नव्हे तर खुर्च्या आणि कॉम्प्युटर फेकफाक करीत तोडफोड केली. ही घटना कार्यालयातील सीसीटीव्हीमध्ये सुद्धा कैद झाली आहे. फिर्यादी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून लकडगंजच्या एपीआय राखी गेडाम यांनी आरोपीविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे व सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The journalist said that the mess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.