जैतापूर प्रकल्प, रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी रद्द करण्यात यावी :नीलम गोऱ्हे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 07:22 PM2017-12-20T19:22:49+5:302017-12-20T19:24:55+5:30

मेट्रोच्या नावाखाली मुंबईत होणारी वृक्षतोड, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प व रिफायनरीला शिवसेनेचा विरोधच राहणार आहे. जैतापूर प्रकल्प, रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी रद्द करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे  यांनी बुधवारी विधान परिषदेत नियम ९७ अन्वये उपस्थित केलेल्या चर्चेत बोलताना केली.

Jaitapur Project, Ratanagiri district refinery should be canceled: Neelam Gorhe | जैतापूर प्रकल्प, रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी रद्द करण्यात यावी :नीलम गोऱ्हे 

जैतापूर प्रकल्प, रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी रद्द करण्यात यावी :नीलम गोऱ्हे 

Next
ठळक मुद्देविधान परिषदेत मागणी

आॅनलाईन लोकमत
नागपूर : मेट्रोच्या नावाखाली मुंबईत होणारी वृक्षतोड, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प व रिफायनरीला शिवसेनेचा विरोधच राहणार आहे. जैतापूर प्रकल्प, रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी रद्द करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे  यांनी बुधवारी विधान परिषदेत नियम ९७ अन्वये उपस्थित केलेल्या चर्चेत बोलताना केली.
केंद्र व राज्य शासन पर्यावरणाच्या गोष्टी व घोषणा करते, परंतु कृती मात्र विरोधात आहे. रिफायनरी प्रकल्पाला शिवसेना व ग्रामस्थांचा विरोध होता. पश्चिम महाराष्ट्रात टेकड्या भूईसपाट करण्याचे काम सुरू आहे. पर्यावरण संवर्धनासाठी समितीचे काम अधिक चांगले होण्याची गरज असल्याचे नीलम गोऱ्हे  यांनी सांगितले.
जागतिक हवामान बदल या विषयावर जागतिक स्तरावर २०१५ ला पॅरिस, क्योटो, जर्मनी येथे परिषदा झाल्या. त्यात करार झाले. १० आॅक्टोबर २०१७ ला महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटची भूमिका जाहीर केली. पर्यावरण गावे व शहरे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु कृ ती होताना दिसत नसल्याचे गोऱ्हे  यांनी सांगितले.

Web Title: Jaitapur Project, Ratanagiri district refinery should be canceled: Neelam Gorhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.