डीएसकेसंबंधीच्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:54 PM2017-12-12T23:54:34+5:302017-12-12T23:58:06+5:30

पुण्यातील डीएसके उद्योग समूहाने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप व व्याप्ती ही मोठी असल्यामुळे त्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे विभाग मुंबई यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

Investigation of the DSK related offense to the Economic Offenses Wing, Chief Minister Fadnavis | डीएसकेसंबंधीच्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

डीएसकेसंबंधीच्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

googlenewsNext

नागपूर : पुण्यातील डीएसके उद्योग समूहाने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप व व्याप्ती ही मोठी असल्यामुळे त्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे विभाग मुंबई यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
भीमराव तापकीर, अमर काळे, असलम शेख, डॉ. सुजित मिणचेकर, राधाकृष्ण विखे-पाटील, विजय वडेट्टीवार, अमिन पटेल, नसीम खान या सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
डीएसके उद्योग समूहाकडून ठेवीदारांच्या ठेवींचा मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. याप्रकरणी डीएसके समूहाचे संचालक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) व इतर दोन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथील आर्थिक गुन्हे
शाखेकडे २८५१ आणि मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे ३५३ गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात सांगितले.

Web Title: Investigation of the DSK related offense to the Economic Offenses Wing, Chief Minister Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.