नागपुरात आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद २१ पासून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:21 PM2018-06-15T22:21:58+5:302018-06-15T22:22:13+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्राच्यावतीने येत्या २१ जूनपासून दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद नागपुरात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती या परिषदेचे मुख्य संयोजक व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.पूरणचंद्र मेश्राम यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.

International Buddhist Conference in Nagpur from 21 | नागपुरात आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद २१ पासून 

नागपुरात आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद २१ पासून 

Next
ठळक मुद्देसुखदेव थोरात यांचे बीजभाषण : १०० पेक्षा अधिक शोधनिबंध

लोकमत न्यूज  नेटवर्क 
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्राच्यावतीने येत्या २१ जूनपासून दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद नागपुरात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती या परिषदेचे मुख्य संयोजक व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.पूरणचंद्र मेश्राम यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
२१ जून रोजी सकाळी १०.३० वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात थायलंड येथील जागतिक बौद्ध विद्यापीठाचे कुलगुरू भदंत फ्रा अनिल शाक्य यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन होईल. परिषदेचे बीजभाषण विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात करतील. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे अध्यक्षस्थानी राहतील. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले प्रामुख्याने उपस्थित राहतील. दोन दिवसीय या परिषदेमध्ये पहिल्या दिवशी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात भंते विमलकीर्ती गुणसिरी, डॉ. यशदत्त अलोने (जेएनयू) डॉ. सॉव संदर (ब्रम्हदेश), डॉ. लिऊ जिन्जुयू (चीन), डॉ. सिद्धार्थ सिंग (बनारस हिंदू विद्यापीठ) आपले विचार मांडतील. दुसऱ्या दिवशीचे सत्र आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्राच्या नवनिर्मित वास्तूमध्ये होईल. यात कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे, डॉ. महेश देवकर, डॉ. हरीश वानखेडे, डॉ. सी.डी. नाईक, डॉ. ज्ञानदित्य शाक्य, डॉ. एम.एल. कासारे, डॉ. बालचंद्र खांडेकर, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. यशवंत मनोहर आदी विचार व्यक्त करतील. परिषदेसाठी १०० पेक्षा अधिक शोधनिबंध प्राप्त झाले आहेत.
पत्रपरिषदेला डॉ. मालती साखरे, डॉ. निज बोधी, डॉ. विकास जांभुळकर उपस्थित होते.

Web Title: International Buddhist Conference in Nagpur from 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.