जगत्जननी-आदिशक्तीची थाटात अधिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 01:27 AM2017-09-22T01:27:31+5:302017-09-22T01:27:46+5:30

मावळतीला लखलखणारे लक्षावधी सोनेरी दिवे...स्वत: मेघांनी अंथरलेला चिंब गालिचा...चौफेर दरवळणारा धूपबत्तीचा स्वर्गीय गंध...भगव्या पताका उंचावत निनादणारे ढोलताशांचे वादन....

The installation of the Jagatjanani-Adishakti styled | जगत्जननी-आदिशक्तीची थाटात अधिष्ठापना

जगत्जननी-आदिशक्तीची थाटात अधिष्ठापना

Next
ठळक मुद्देनागपूर दुर्गा महोत्सवाचा रंगारंग प्रारंभ : ‘लोकमत’ व राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचे आयोजन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, विजय दर्डा यांच्या हस्ते पहिली आरती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मावळतीला लखलखणारे लक्षावधी सोनेरी दिवे...स्वत: मेघांनी अंथरलेला चिंब गालिचा...चौफेर दरवळणारा धूपबत्तीचा स्वर्गीय गंध...भगव्या पताका उंचावत निनादणारे ढोलताशांचे वादन.... आणि ‘सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते...’च्या अखंड गजरात गुरुवारी संध्याकाळी आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, महापौर नंदा जिचकार यांच्या उपस्थितीत लक्ष्मीनगर व्हॉलिबॉल मैदानात जगत्जननी-आदिशक्ती असलेल्या देवी दुर्गेची थाटात अधिष्ठापना करण्यात आली. या अधिष्ठापनेसोबतच मध्य भारतातील सर्वात मोठ्या अशा नागपूर दुर्गोत्सवालाही प्रारंभ झाला. राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचे हे १२ वे वर्ष आहे. धार्मिक, सांस्कृतिक व बौद्धिक कार्यक्रमांची रेलचेल असणाºया या भव्य आयोजनाला ‘लोकमत’चेही सहकार्य लाभले आहे.
यंदाच्या या दुर्गोत्सवाचे मुख्य आकार्षण ‘माझी मेट्रो’ या संकल्पनेवर साकारलेली स्वयंचलित मेट्रोची प्रतिकृती आहे. भविष्यात शहरात धावणाºया ‘मेट्रो’चे ‘फिल’ प्रत्यक्ष देणाºया या प्रतिकृतीचे पाहुण्यांनी फित कापून उद्घाटन केले. यानंतर प्रतिकृतीची पाहणी केली. खºयाखुºया ‘मेट्रो’प्रमाणे ‘अनाऊन्समेंट’ प्रणाली, एलईडी स्क्रीन इतकेच काय तर ‘एसी’देखील असल्याचे बघून राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विजय दर्डा, महापौर नंदा जिचकार यांनी राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकाºयांचे कौतुक केले. यानंतर सर्व मान्यवर मूर्ती स्थापित असलेल्या मुख्य मंडपात पोहोचले. येथे या सर्व मान्यवरांंच्या हस्ते दुर्गा देवीची आरती करण्यात आली. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष प्रसन्ना मोहिले व त्यांच्या सहकाºयांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विजय दर्डा, महापौर नंदा जिचकार यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी शहरातील नामांकित मंडळींनीदेखील मंडळाला भेट दिली. यात ‘द हितवाद’चे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र पुरोहित, ‘हायकोर्ट बार असोसिएशन’ व ‘जनमंच’चे अध्यक्ष अ‍ॅड.अनिल किलोर, दंदे फाऊंडेशनचे संचालक व प्रसिद्ध चिकीत्सक डॉ.पिनाक दंदे, नगरसेविका वनिता दांडेकर, माजी नगरसेवक गोपाळ बोहरे यांचा प्रामुख्याने समावेश होता.
स्वातंत्र्यलढ्याचा क्रांतिकारी इतिहास
या महोत्सवाचे दुसरे मुख्य आकर्षण म्हणजे क्रांतिकारी भगतसिंग यांच्या जीवनावरील दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन. यासाठी मंडळाने खास पंजाबमधून भगतसिंग यांची दुर्मिळ छायाचित्रे आणली आहेत. १८५७ पासूनचा इतिहास १२५ चित्रांतून येथे साकारण्यात आला आहे. भगतसिंग यांच्यासोबतच इतरही क्रांतिकाºयांची दुर्मिळ छायाचित्रे येथे आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटनही या पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
गंगा नदीच्या मातीतून मूर्तीची निर्मिती
१८ बाय ४० असा भव्य आकार असलेली दुर्गा देवीची मूर्ती लक्ष वेधून घेणारी आहे. या मूर्तीच्या निर्मितीसाठी खास कोलकात्याहून मूर्तिकार येथे आले होते. त्यांनी गंगा नदीच्या मातीतून या मूर्तीची निर्मिती केली असून ही घडवायला त्यांना एक महिन्याचा कालावधी लागला. दुर्गेच्या मुख्य मूर्तीसोबतच सरस्वती, कालिमातेचीही मूर्ती येथे स्थापित करण्यात आली आहे. पावसाचे वातावरण लक्षात घेता दुर्गोत्सवासाठी मंडळातर्फे विशेष ‘वॉटरप्रूफ डोम’ तयार करण्यात आला आहे. येथे शुक्रवारपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील. मुख्य मंडपातील मनमोहक कसाकुसर व नक्षीकामही भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
‘आयफेल टॉवर’ वेधतोय लक्ष
या दुर्गाेत्सवाच्या प्रवेशद्वाराची विशेष चर्चा आहे. याला कारणही तसेच आहे. आलेक्सांद्र ग्यूस्ताव्ह आयफेल या फ्रेंच वास्तुविशारदाने पॅरिसमध्ये उभारलेल्या जगप्रसिद्ध आयफेल टॉवरची प्रतिकृती या प्रवेशद्वारावर साकारण्यात आली आहे. लक्षावधी दिव्यांनी सजलेले हे प्रवेशद्वार तरुणाईसाठी ‘सेल्फी पॉर्इंट’ बनले आहे.

Web Title: The installation of the Jagatjanani-Adishakti styled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.