IndiGo's eight flights late in Nagpur | नागपुरात इंडिगोच्या आठ विमानांना उशीर
नागपुरात इंडिगोच्या आठ विमानांना उशीर

ठळक मुद्देप्रवाशांना सहन करावा लागला त्रास

 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाच्या अन्य शहरातून इंडिगोची आठ विमाने नागपुरात उशीरा पोहोचली. पुणे-नागपूर  विमान पुणे येथून नागपुरात एक तास १६ मिनिटे उशीरा अर्थात रात्री ८.२० ऐवजी ८.३६ मिनिटांनी पोहोचले. तसेच बेंगळुरू-नागपूर विमानाला एक तास उशीर झाला.
याशिवाय अन्य विमानांने १६ ते ४४ मिनिटे नागपुरात उशीरा पोहोचली. उशीरा नागपुरात आलेल्या विमानांमध्ये इंडिगोचे हैदराबाद-नागपूर, कोची-नागपूर, चेन्नई-नागपूर, सायंकाळी अन्य वेळात येणारी बेंगळुरू-नागपूर ही दोन विमाने, दिल्ली-नागपूर आदींचा समावेश आहे. नागपुरात येणारी विमाने उशीरा आल्यामुळे अन्य शहरात उड्डाणांना उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

 


Web Title: IndiGo's eight flights late in Nagpur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.