वीज वितरण फ्रेंचायसीवर इंडिया पॉवरची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:24 AM2019-03-15T10:24:30+5:302019-03-15T10:26:38+5:30

शहरातील वीज वितरण फ्रेंचायसी एस्सेल समूहाची कंपनी एसएनडीएलने भागीदार (कंपनीसाठी स्ट्रॅटेजिक पार्टनर) बनविण्याची तयारी सुरू केली आहे.

India Power's Watch on Power distribution franchisees | वीज वितरण फ्रेंचायसीवर इंडिया पॉवरची नजर

वीज वितरण फ्रेंचायसीवर इंडिया पॉवरची नजर

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूरपासून दिल्लीपर्यंत हालचाली एसएनडीएल कर्मचाऱ्यांची वाढली चिंता

कमल शर्मा।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील वीज वितरण फ्रेंचायसी एस्सेल समूहाची कंपनी एसएनडीएलने भागीदार (कंपनीसाठी स्ट्रॅटेजिक पार्टनर) बनविण्याची तयारी सुरू केली आहे. वीज वितरण क्षेत्रात अनेक वर्षांपासून सक्रिय असलेली कंपनी इंडिया पॉवर यासाठी उत्सुक आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये दिल्लीत अनेक बैठका झाल्या आहेत. इंडिया पॉवरच्य चमूने नागपुरात येऊन वीज वितरण प्रणालीची पाहणीसुद्धा केली आहे. यादरम्यान एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांची चिंता वाढत आहे. त्यांनी व्यवस्थापकांना पत्र लिहून कर्मचाऱ्यांना वितरित केलेल्या इन्सेन्टिव्हची रक्कम कापण्यात आल्याचा विरोधसुद्धा दर्शविला आहे.
महावितरणने १ मे २०११ रोजी शहरातील तीन डिव्हिजनची वीज वितरण यंत्रणा स्पॅन्को कंपनीच्या हवाली केली होती. स्पॅन्को ही जबाबदारी सांभाळू शकली नाही. त्यांनी एस्सेल समूहाच्या एस्सेल युटीलिटी कंपनीला आपली भागीदारी विकली. सप्टेंबर २०१२ मध्ये एस्सेल युटीलिटी एसएनडीएलच्या नावाने शहरातील कामकाज सांभाळले. आज ही कंपनी गंभीर आर्थिक संकटात सापडली आहे. कर्मचाऱ्यांना वितरित केलेली परफॉर्मन्स लिंक इन्सेन्टिव्ह (पीएलआय) एकूण पगाराच्या २० टक्के रक्कम परत घेण्याची वेळ कंपनीवर आली आहे. कंपनीने तीन भागात ही रक्कम परत घेणार असल्याचे घोषित केले आहे. मार्चमध्ये पहिली किस्त परत घेण्यात आली आहे.
कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये यावरून प्रचंड असंतोष पसरला आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनी हेड सोनल खुराणा यांना पत्र पाठवून याचा विरोधही केला आहे. पत्रात म्हटले आहे की, पैसे परत घेतल्याने त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. ते आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत पूर्ण एकाग्रतेने काम करण्यास ते असमर्थ आहेत.
खुराना यांनी त्यांना सांगितले की, या प्रकरणाबाबत मुख्यालयाशी चर्चा सुरू असून तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे सूत्रांनी दावा केला आहे. की आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कंपनी भागीदार (पार्टनर) शोधत आहे. युद्धस्तरावर काम सुरु आहे. कंपनीचे प्रेसिडेंट कमल माहेश्वरी यांनी सांगितले आहे की, विकास व नवीन तंत्रज्ञान मिळवण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. असे सांगितले जाते की, एसएनडीएल्या दिल्ली येथील मुख्यालयात दररोज इंडिया पॉवरच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. कंपनीच्या एका टीमने नागपुरात येऊन एसएनडीेलच्या कामकाजाचा आढावासुद्धा घेतला आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार हे डील पक्के होत असल्याच्या दिशेने आहे.

आसनसोलमध्ये वितरण लायसेन्स
कधीकाळी डीपीएससी या नावाने ओळखली जाणारी कंपनी इंडिया पॉवर कॉर्पोरेशनची स्थापना १९१९ मध्ये झाली आहे. कंपनीकडे आसनसोल आणि राणीगंज येथील वीज वितरणाचा परवाना (लायसेन्स) आहे. ओडिशामध्ये सुद्धा कंपनी सक्रिय आहे. आता नागपूरच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.

Web Title: India Power's Watch on Power distribution franchisees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज