संविधान व बाबासाहेबांमुळेच महिलांना स्वातंत्र्य व अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:57 PM2018-10-15T22:57:04+5:302018-10-15T23:00:56+5:30

भारतीय सामाजिक व्यवस्थेत अस्पृश्यांसह हजारो वर्षांपासून महिलांनाही गुलामगिरीत जगावे लागले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या स्थितीत फारसा बदल घडला नाही. मात्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानामुळेच खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रियांना स्वातंत्र्य आणि अधिकार मिळाले, असे प्रतिपादन अ‍ॅड. जयश्री शेळके यांनी केले.

Independence and rights for women due to the Constitution and Babasaheb | संविधान व बाबासाहेबांमुळेच महिलांना स्वातंत्र्य व अधिकार

संविधान व बाबासाहेबांमुळेच महिलांना स्वातंत्र्य व अधिकार

Next
ठळक मुद्देदीक्षाभूमी : महिला परिषदेत जयश्री शेळके यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय सामाजिक व्यवस्थेत अस्पृश्यांसह हजारो वर्षांपासून महिलांनाही गुलामगिरीत जगावे लागले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या स्थितीत फारसा बदल घडला नाही. मात्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानामुळेच खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रियांना स्वातंत्र्य आणि अधिकार मिळाले, असे प्रतिपादन अ‍ॅड. जयश्री शेळके यांनी केले.
६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहब आंबेडकर स्मारक समिती व दीक्षाभूमि महिला धम्म संयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यामाने सोमवारी दीक्षाभूमीवर आयोजित महिला परिषदेअंतर्गत ‘भारतीय संविधान आणि लोकशाहीसमोरील आव्हाने’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ता अ‍ॅड. शेळके बोलत होत्या. याप्रसंगी समितिच्या अध्यक्षा डॉ. कमलताई गवई, रेखाताई खोब्रागडे, अ‍ॅड. स्मिता कांबले, समितीच्या उपाध्यक्षा प्रा. डॉ. सरोज आगलावे, सहसचिव तक्षशिला वाघधरे, प्रा. डॉ. प्रज्ञा बागडे, डॉ. सरोज शामकुवर प्रामुख्याने उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, संविधानामुळेच प्रत्येकाला स्वातंत्र्य, समतेच्या मूल्याने हक्कांची लढाई लढता येते. धर्म स्वातंत्र्यामुळे प्रत्येकजन त्यांच्या धर्मानुसार आचरण करण्यास मोकळा आहे. त्यामुळे संविधानाचे रक्षण व सन्मान करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मात्र आज काही शक्ती संविधान हटविण्याचे षडयंत्र रचत आहेत. त्यांचा संघटीत होउन प्रतिकार करण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले.
रेखा खोब्रागडे यांनी मनोगत व्यक्त करताना, संविधानाने प्रत्येक व्यक्तीला सुरक्षाकवच प्रदान केले असून त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा दर्जा वाढला असल्याचे मत व्यक्त केले. संविधानामुळेच देश एकसंघ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. काही विषमतावादी लोक संविधान बदनाम करून त्यास नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे संविधान रक्षणासाठी सर्वांनी एकत्रीत येण्याचे आवाहन प्रा. डॉ. सरोज आगलावे यांनी केले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या तरुण कार्यकर्त्यांनी संविधान पोवाडा सादर केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तक्षीशीला वागधरे यांनी केले. संचालन वंदना जीवने यांनी तर लता गजभिये यांनी आभार मानले.

आजपासून धम्मदीक्षा सोहळा
दीक्षाभूमीवर मंगळवारपासून धम्मदीक्षा सोहळ््याचे आयोजन करण्यात आले आहे. भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात सकाळी ९ वाजता दीक्षा सोहळा सुरू होईल. दीक्षा ग्रहण करण्यासाठी देशविदेशातून शेकडो लोक दीक्षाभूमीवर पोहचले आहेत.

Web Title: Independence and rights for women due to the Constitution and Babasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.