राज्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 01:43 AM2018-08-18T01:43:59+5:302018-08-18T01:44:44+5:30

केंद्र आणि राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. असे असताना शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मात्र थांबविण्यात शासनाला यश येऊ शकले नाही. होय, हे खरे आहे. शेतकरी आत्महत्यासंदर्भातील प्रश्न खा. कृपाल तुमाने यांनी लोकसभेत उपस्थित केला होता. त्याचे उत्तर आता मिळालेले असून त्यात २०१३ पासून शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याचे केंद्र शासनाने मान्य केले आहे.

Increase in farmer suicides in the state | राज्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ

राज्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देकेंद्र शासनाची कबुली : कृपाल तुमाने यांनी विचारला होता प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र आणि राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. असे असताना शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मात्र थांबविण्यात शासनाला यश येऊ शकले नाही. होय, हे खरे आहे. शेतकरी आत्महत्यासंदर्भातील प्रश्न खा. कृपाल तुमाने यांनी लोकसभेत उपस्थित केला होता. त्याचे उत्तर आता मिळालेले असून त्यात २०१३ पासून शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याचे केंद्र शासनाने मान्य केले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसात शेतकरी आत्महत्या वाढलेल्या असून त्या चिंताजनक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. राज्यात २०१३, २०१४ आणि २०१५ मध्ये किती शेतकरी आत्महत्या झाल्या या अनुषंगाने खा. तुमाने यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी केंद्रीय कृषिमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी याबाबतची लेखी माहिती उपलब्ध करून देण्याची सूचना केली होती. त्यानुसार तुमाने यांना लेखी स्वरुपात माहिती देण्यात आली. त्या उत्तरानुसार, महाराष्ट्रात २०१३ मध्ये ३१४६, २०१४ मध्ये ४००४ तर २०१५ मध्ये ४२०१ अशा एकूण ११ हजार ३५१ शेतकरी आत्महत्या तीन वर्षात झाल्याचे केंद्र शासनाने कळविले. यावरून २०१३ पासून शेतकरी आत्महत्यांमध्ये राज्यात वाढ होत असल्याचे स्पष्ट होते.
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत तुमाने यांनी माहिती विचारली होती. त्यावर उत्तर देताना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या समित्या शेतकरी आत्महत्या करण्याच्या समस्यांवर समीक्षा करून उपाययोजना करीत असल्याचे सांगण्यात आलेले आहे.

Web Title: Increase in farmer suicides in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.