दीक्षाभूमी येथे मनपाच्या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:10 AM2018-10-18T00:10:25+5:302018-10-18T00:11:43+5:30

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरातून दीक्षा भूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. यासाठी दीक्षाभूमी परिसरात चोखामेळा अण्णाभाऊ साठे चौक येथे महापालिकेने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. बुधवारी महापौर नंदा जिचकार यांच्या या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

Inauguration of Municipal Control Room at Dikshabhoomi | दीक्षाभूमी येथे मनपाच्या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन

दीक्षाभूमी येथे मनपाच्या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन

googlenewsNext
ठळक मुद्देमहापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते उदघाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरातून दीक्षा भूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. यासाठी दीक्षाभूमी परिसरात चोखामेळा अण्णाभाऊ साठे चौक येथे महापालिकेने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. बुधवारी महापौर नंदा जिचकार यांच्या या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
येणाऱ्यांची विशेष काळजी घेण्यात यावी. संपूर्ण दीक्षाभूमी परिसरात स्वच्छतेसह अनुयायांच्या आरोग्याबाबत काळजी घेताना सर्वांनी सेवा हाच धर्म या भावनेतून काम करावे, असे आवाहन नंदा जिचकार यांनी यावेळी केले. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, लक्ष्मी नगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखने, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, डॉ. संजय कांबळे, डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता अमीन अख्तर, विद्युत अभियंता संजय जायस्वाल, सहायक अग्निशमन अधिकारी केशव कोठे, आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, हत्तीरोग अधिकारी डॉ.जयश्री थोटे, लक्ष्मीनगर झोनचे झोनल आरोग्य अधिकारी रामभाऊ तिडके, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, राजेश हाथीबेड उपस्थित होते.

Web Title: Inauguration of Municipal Control Room at Dikshabhoomi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.