वाहतूक नियम तोडत असाल तर, सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:31 AM2018-12-12T00:31:43+5:302018-12-12T00:33:59+5:30

शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लागले असल्यामुळे वाहनचालकांना वाहतूक नियम तोडणे चांगलेच महागात पडत आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल-२०१७ ते आॅक्टोबर-२०१८ पर्यंत १५३३ ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले आहेत. तसेच, वाहतूक विभागाने वाहतूक नियम तोडणाऱ्या २ लाख ८६ हजार ३३८ व्यक्तींपैकी १ लाख ३ हजार ९४१ व्यक्तींना चालान तामील केले आहेत.

If traffic rules break, be careful! | वाहतूक नियम तोडत असाल तर, सावधान!

वाहतूक नियम तोडत असाल तर, सावधान!

Next
ठळक मुद्दे१५३३ ड्रायव्हिंग लायसन्स रद्द१ लाख ३ हजार ९४१ वाहनचालकांना चालान तामील

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लागले असल्यामुळे वाहनचालकांना वाहतूक नियम तोडणे चांगलेच महागात पडत आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल-२०१७ ते आॅक्टोबर-२०१८ पर्यंत १५३३ ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले आहेत. तसेच, वाहतूक विभागाने वाहतूक नियम तोडणाऱ्या २ लाख ८६ हजार ३३८ व्यक्तींपैकी १ लाख ३ हजार ९४१ व्यक्तींना चालान तामील केले आहेत.
विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी गत १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या विशेष उपसमितीच्या बैठकीचे इतिवृत्त मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले. त्यात ही माहिती देण्यात आली. इतिवृत्तातील अन्य माहितीनुसार, न्यायालयाने वाहतूक सिग्नल व वाहतूक पोलिसांच्या वेतनाचा खर्च वाहतूक नियम तोडणाºयांवर अतिरिक्त दंड आकारून वसूल करता येऊ शकतो का, अशी विचारणा केली होती. त्यानुसार, सरकारला प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शहरातील ७०० चौकांत ३,९१२ सीसीटीव्ही कॅमेरे लावणे प्रस्तावित असून, त्यापैकी ३,६८२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सध्या ३०४ कॅमेरे विविध कारणांमुळे काढण्यात आले आहेत किंवा बंद आहेत. भरारी पथकाने शाळा-महाविद्यालयात जाऊन ६१४ विद्यार्थ्यांवर कारवाई केली व त्यांच्याकडून ३ लाख २२ हजार रुपये दंड वसूल केला. महापालिकेने पार्किंग व्यवस्था नसलेल्या ६५ शिकवणी वर्ग संचालकांना नोटीस बजावली.
शहरात ४५७ गोठ्यांकडे परवाने असून, ५८९ गोठे विनापरवाना सुरू आहेत. आतापर्यंत ७९४ जनावरांचे टॅगिंग करण्यात आले आहे. परवाना नूतनीकरण व जनावरांचे टॅगिंग न करणाºया ३५ गोठ्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. वाहतूक विभागाने मोकाट जनावरांच्या ३० मालकांवर कारवाई केली आहे. मोरभवन येथून सध्या राज्य परिवहन महामंडळ व मनपा बसेसच्या १५०० वर फे ºया होतात. अशा परिस्थितीत चंद्रपूर, वर्धा, अमरावती व काटोल मार्गाच्या बसेस सुरू केल्यास १००० फे ºया वाढून वाहतूककोंडी होईल, असा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला.

नंदग्राम प्रकल्पाचा आराखडा सादर
गोठे शहराबाहेर स्थानांतरित करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या नंदग्राम प्रकल्पाचा आराखडा नगर रचना विभागाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. हा प्रकल्प १९.३९ हेक्टर जमिनीवर उभारला जाणार आहे. प्रकल्पात १० जनावरांसाठी १ याप्रमाणे ४६८ गोठे बांधले जाणार आहेत.

 

Web Title: If traffic rules break, be careful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.