शिंकलो तर मोदींना इशारा, हसलो तर अमित शहांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 07:54 AM2019-02-17T07:54:09+5:302019-02-17T07:54:38+5:30

मी रा. स्व. संघाचा आवडता आहे, असे माध्यमे म्हणतात. पण पण संघामध्ये असे कुणी आवडते-नावडते नसते. संघटना व देशासाठी काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता संघाचा लाडका असतो, असेही त्यांनी बोलून दाखवले.

If Shinke, Modi would have gestured, laughing and Amit smiled | शिंकलो तर मोदींना इशारा, हसलो तर अमित शहांना टोला

शिंकलो तर मोदींना इशारा, हसलो तर अमित शहांना टोला

Next

गजानन जानभोर

नागपूर : मला अजिबात पंतप्रधान व्हायचे नाही. माझे ते स्वप्नही नाही. भिंतीवर पोस्टर चिकटविणाऱ्या कार्यकर्त्याला एवढे मिळाले, ते पुरेसे नाही का? किंबहुना क्षमतेपेक्षा जास्तच मिळाले. त्यामुळे नरेंद्र मोदी हेच पुढचे पंतप्रधान असतील, असे भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ‘लोकमत’च्या मुलाखतील स्पष्ट केले.

मी रा. स्व. संघाचा आवडता आहे, असे माध्यमे म्हणतात. पण पण संघामध्ये असे कुणी आवडते-नावडते नसते. संघटना व देशासाठी काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता संघाचा लाडका असतो, असेही त्यांनी बोलून दाखवले. तुमच्या विधानांमुळे सतत गोंधळ निर्माण का होतो, या प्रश्नावर गडकरी उत्तरले की, माझ्या विधानांचा पराचा कावळा करण्यात आला. तुम्हाला वेगाने टक्कल पडले आहे’ असे मी म्हटले तरी तुम्ही माझ्या या म्हणण्याचा संदर्भ पंतप्रधान मोदींशी जोडाल. शिंकलो तर मोदींना इशारा, हसलो तर अमित शहांना टोला आणि या शिंकण्या-हसण्याला म्हणे संघाचा आशीर्वाद! मी सहज केलेल्या विधानांचा हा विपर्यास आहे. सध्या प्रसारमाध्यमे आणि विरोधक माझ्या प्रत्येक वक्तव्याकडे भिंग लावून पाहत आहेत. आता मी जे काही बोलणार त्याचा विपर्यास करू नका, नाहीतर आणखी दहा खुलासे करावे लागतील. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींच्या विधानांसंदर्भात सूतावरून स्वर्ग गाठू नका. त्यातून त्या व्यक्तीला मनस्ताप होतो. शिवाय तुमची विश्वासार्हताही धोक्यात येते.

विरोधासाठी विरोध मला जमत नाही. निवडणुका या १५ दिवसांसाठी असतात. त्या संपल्या की द्वेष, टीका मनातून काढायला हव्यात. परवा सोनिया गांधी यांच्यासह विरोधकांनी लोकसभेत माझे अभिनंदन केले. हीच माझ्या कामाची पावती आहे, असे सांगून गडकरी म्हणाले की, एक गोष्ट मी ठरविली आहे, सर्वांनाच मदत करायची आणि वाईट कुणाचेही करायचे नाही. सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी माझ्याकडे येतात. ती कामे लोकांची असतात. त्यांना मदत करुन मी फार मोठे उपकार करत नाही. त्यात राजकारण म्हणून आडकाठ्या आणणे ही शुद्ध बदमाशी आहे. ते मला आयुष्यात जमणार नाही. शिवसेना सतत भाजपावर टीका, आरोप करीत असूनही तुमचा पक्ष युतीसाठी इतका आग्रही का आहे, या प्रश्नावर गडकरी म्हणाले की, युती दोघांसाठीही फायद्याची आहे. मने कलुषित करून युती झाली तर कार्यकर्ते मनापासून काम करणार नाहीत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी संयम बाळगायला हवा. राजकारणात महत्त्वाकांक्षा बाळगली की कितीही मोठी पदे मिळाली तरी माणून
अतृप्तच राहतो. मंत्री म्हणून काम करताना मी लहानसहान गोष्टींत समाधान शोधतो.

कटकारस्थान मला जमत नाही. कुणाच्या मागे कुचाळक्या करणे माझ्या स्वभावात नाही. जे आहे ते रोखठोक, स्पष्ट बोलतो. ‘टेक तर टेक नाही तर रामटेक’ असा माझा स्वभाव आहे. नेमक्या याच स्वभावाचे हे दुष्परिणाम मला अलीकडच्या काळात निष्कारण भोगावे लागत आहेत. पण माझा हा मोकळाढाकळा स्वभाव मी सोडणार नाही. तुम्ही कितीही लिहा, टीव्हीवर कसेही दाखवा.
- गडकरी


 

Web Title: If Shinke, Modi would have gestured, laughing and Amit smiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.