नागवंशी म्हणून नागपूरची जगभरात ओळख : भीमराव आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:10 PM2019-03-23T23:10:32+5:302019-03-23T23:12:53+5:30

नागपूर ही बौद्ध धम्माचे अनुयायी असलेल्या नागवंशीयांची भूमी राहिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक धम्मक्रांतीमुळे ही ओळख अधोरेखित झाली आणि नागपूरला जगभरात वेगळे महत्त्व प्राप्त झाले, असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे एक्झिक्युटिव्ह कमांडर इन चीफ आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी येथे केले.

Identity of Nagpur as Nagvanshi: Bhimrao Ambedkar | नागवंशी म्हणून नागपूरची जगभरात ओळख : भीमराव आंबेडकर

नागवंशी म्हणून नागपूरची जगभरात ओळख : भीमराव आंबेडकर

googlenewsNext
ठळक मुद्देसमता सैनिक दल राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर ही बौद्ध धम्माचे अनुयायी असलेल्या नागवंशीयांची भूमी राहिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक धम्मक्रांतीमुळे ही ओळख अधोरेखित झाली आणि नागपूरला जगभरात वेगळे महत्त्व प्राप्त झाले, असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे एक्झिक्युटिव्ह कमांडर इन चीफ आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी येथे केले.
भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर सभागृहात दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, समता सैनिक दलाचे जॉईंट कमांडर गदीश गवई, राष्ट्रीय सरचिटणीस एस.के. भंडारे, दशरथ शंभरकर, सी.आर. सोनडवले, प्रवीण निखाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
भीमराव आंबेडकर म्हणाले, देशाचा केंद्रबिंदू असलेल्या नागपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. ही एक ऐतिहासिक धम्मक्रांती ठरली. त्यामुळे नागवंशीयाची भूमी जगभरात ओळखल्या गेली. दीक्षाभूमी ही समस्त शोषित, पीडित समाजाची ऊर्जाभूमी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दीक्षाभूमी परिसरात दोन दिवसीय अधिवेशन व रविवारी खुले अधिवेशन होणार आहे. तत्पूर्वी सकाळी संविधान चौक ते दीक्षाभूमीपर्यंत समता मार्च काढण्यात येईल.

Web Title: Identity of Nagpur as Nagvanshi: Bhimrao Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.