वडिलांना सलामी देण्यासाठी आयएएस व्हायचंय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 03:42 PM2018-06-09T15:42:19+5:302018-06-09T15:42:54+5:30

वडील एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक आहेत. त्यांचा पगार तुटपुंजा आहे, पण त्याबाबत काही वाटत नाही. मात्र कंपनीतील कुणी येत-जात असताना सलामी देणाऱ्या वडिलांचा विचार आला की मन अस्वस्थ होते. म्हणून एक दिवस मी आयएएस होणार आणि वडिलांना सलामी देणार, अशी जिद्द दहावीच्या परीक्षेत ९१.६ टक्के गुण घेणाºया आकाश रुईकरने व्यक्त केली.

I wants to become IAS for give salute to my Father | वडिलांना सलामी देण्यासाठी आयएएस व्हायचंय!

वडिलांना सलामी देण्यासाठी आयएएस व्हायचंय!

Next
ठळक मुद्देसुरक्षा रक्षकाच्या मुलाची जिद्द : आकाशला ९१.६ टक्के गुण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वडील एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक आहेत. त्यांचा पगार तुटपुंजा आहे, पण त्याबाबत काही वाटत नाही. मात्र कंपनीतील कुणी येत-जात असताना सलामी देणाऱ्या वडिलांचा विचार आला की मन अस्वस्थ होते. म्हणून एक दिवस मी आयएएस होणार आणि वडिलांना सलामी देणार, अशी जिद्द दहावीच्या परीक्षेत ९१.६ टक्के गुण घेणाºया आकाश रुईकरने व्यक्त केली.
जाईबाई चौधरी शाळेच्या आकाश अनिल रुईकर या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत ९१.६ टक्के गुण प्राप्त केले आहेत. हे गुण त्याच्या जिद्दीचा परिचय देणारे आहेत. वडील अनिल रुईकर हे एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत व आई माधुरी या गृहिणी आहेत. वडिलांच्या तुटपुंज्या पगारावर कुटुंबाचा डोलारा सांभाळावा लागतो. पगार कमी असला तरी आम्ही भागवून घेतो, असे समाधान बाळगणारे मनोगत आकाशने व्यक्त केले. मात्र कुटुंबासाठी राबताना होणारी ओढाताण वडिलांनी व्यक्त केली. मुलांनी यशस्वी व्हावे, यासाठी प्रत्येकच आईवडील त्रास सहन करतात, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. आकाश मात्र हुशार. कुठल्याही अवस्थेत दिवसभरातून ६ ते ८ तास नियमित अभ्यास करायचा, असा त्याचा नित्यक्रम. यामध्ये शाळेतील शिक्षकांचे मोठे सहकार्य मिळाल्याचे तो सांगतो. मेडिटेशनचाही फायदा झाल्याचे त्याने सांगितले. कुठल्याही परिस्थितीत आयएएस होणार, अशी जिद्द त्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

Web Title: I wants to become IAS for give salute to my Father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.