तेलकट पदार्थांमुळे हायपरटेन्शनचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:34 PM2019-07-17T12:34:46+5:302019-07-17T12:35:12+5:30

: तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे ‘ट्रान्स फॅटी अ‍ॅसिड’चे प्रमाण शरीरात वेगाने वाढते. परिणामी, हायपरटेन्शन आणि हृदय रोगासाठी हे मुख्य कारण ठरत आहे. महाराष्ट्रात हृदयरोग मृत्यूच्या प्रकरणांमध्ये ६२ टक्के वाढ झाली आहे.

Hypertension risk due to oily substances | तेलकट पदार्थांमुळे हायपरटेन्शनचा धोका

तेलकट पदार्थांमुळे हायपरटेन्शनचा धोका

Next
ठळक मुद्देहृदयरोग मृत्यूच्या प्रकरणात ६२ टक्क्याने वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे ‘ट्रान्स फॅटी अ‍ॅसिड’चे प्रमाण शरीरात वेगाने वाढते. परिणामी, हायपरटेन्शन आणि हृदय रोगासाठी हे मुख्य कारण ठरत आहे. महाराष्ट्रात हृदयरोग मृत्यूच्या प्रकरणांमध्ये ६२ टक्के वाढ झाली आहे. हृदयरोगाला दूर ठेवण्यासाठी ‘ट्रान्स फॅटी अ‍ॅसिड’युक्त खाद्यपदार्थांना दूर ठेवायला हवे; सोबतच हायपरटेन्शनपासून मुक्त राहण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असा सूर तज्ज्ञांचा होता.
‘हायपरटेन्शन मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रान्स फॅट अ‍ॅलिमिनेशन इन महाराष्ट्र’ या विषयावर सामाजिक संस्था दिशा फाऊंडेशनच्यावतीने मंगळवारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागी झालेल्या विविध विषयातील तज्ज्ञांनी आपले मत मांडले. या चर्चासत्राच्या समारोपीय कार्यक्रमात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार उपस्थित होते. सोबतच जागतिक आरोग्य संघटनेचे (भारत) नॅशनल प्रोफेशनल ऑफिसर डॉ. अभिषेक कुंवर, दिल्ली विद्यापीठाचे डॉ. इराम एस. राव, ‘कंझ्यूमर वॉयस’चे असीम सान्याल, दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अंजली बोºहाडे, एफडीए नागपूरचे वरिष्ठ खाद्य सुरक्षा अधिकारी मनोज तिवारी, आहार विशेषज्ञ जयश्री पेंढारकर आदी उपस्थित होते.
डॉ. संजीव कुमार म्हणाले, राज्यात हायपरटेन्शनची मोठी समस्या म्हणून समोर येत आहे. नागपुरातील तीन लाखांपेक्षा जास्त लोकांना रक्तदाबाशी जुळलेल्या समस्या आहेत. धक्कादायक म्हणजे, अनेकांना याविषयी माहितीही नाही. रक्तदाबाची तपासणी सामान्य असतानाही याला गंभीरतेने घेतले जात नाही. म्हणूनच शासकीय व वैद्यकीय क्षेत्रातील विशेषज्ञांना याबाबत संयुक्त स्वरूपात प्रयत्न करण्याची गरज आहे.
डॉ. अभिषेक कुंवर म्हणाले, देशात हायपरटेन्शनमुळे मृत्यूचे प्रामण गतीने वाढत चालले आहे. यामुळेच केंद्र सरकारला ‘हायपरटेन्शन कंट्रोल इनिसिएटिव्ह प्रोग्राम’ (आयएचसीआय) सुरू करावा लागला. या कार्यक्रमासाठी पहिल्या टप्प्यात राज्याच्या भंडारा, वर्धा, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात आली. यात रुग्णांचा हायपरटेन्शनची तपासणी केली जाणार आहे.

लोकांमध्ये जागरूकतेची गरज
डॉ. इराम राव म्हणाले, जेव्हा ‘ट्रान्स फॅटी अ‍ॅसिड’ला ‘औद्योगिक फूड’ पुरवठा व्यवस्थेपासून वेगळे करावे लागेल, तेव्हाच हृदयरोगावर नियंत्रण येईल. लोकांना ‘ट्रान्स फॅटी अ‍ॅसिड’च्या सेवनापासून वाचण्यासाठी जागरूक करणेही गरजेचे आहे. जगात अनेक देशांमध्ये ‘ट्रान्स फॅट’ खाद्याला वेगळे केले आहे.

‘ट्रान्स फॅटी अ‍ॅसिड’वर नियंत्रण आवश्यक
असीम सान्याल म्हणाले, ‘फूड सेफ्टी अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ने (एफएएसएसआय) ‘ट्रान्स फॅटी अ‍ॅसिड’वर नियंत्रण आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जानेवारी २०२२ पर्यंत सर्वप्रकारचे खाद्यतेल आणि ‘फॅट’मध्ये ‘ट्रान्स फॅटी अ‍ॅसिड’चे (टीएफए) प्रमाण २ टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य आहे. ‘टीएफए’च्या तपासणीसाठी महाराष्ट्र राज्यात कुठलीही प्रभावी यंत्रणा नाही, असेही ते म्हणाले.

हायपरटेन्शनला दूर ठेवणे गरजेचे
डॉ. अंजली बोºहाडे म्हणाल्या, ‘ट्रान्स फॅटी अ‍ॅसिड’वर अंकुश लावले जाऊ शकते. हायपरटेन्शनला दूर ठेवण्यासाठी ‘ट्रान्स फॅटी अ‍ॅसिड’विषयी माहिती घेणे व त्याला आपल्या आहारातून दूर ठेवणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी डॉ. मनोज तिवारी आणि आहार विशेषज्ञ जयश्री पेंढारकर यांनीही काही सूचना केल्या.

‘ट्रान्स फॅट’फ्री करण्याचे लक्ष्य
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) २०२३ पर्यंत ‘ट्रान्स फॅट फ्री’ करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे. भारतात वनस्पती तूप ‘टीएमए’चा सर्वात मोठे स्रोत आहे. याचे सेवन बंद करायला हवे. शिवाय, वारंवार गरम करण्यात येणाऱ्या तेलाचा उपयोगही टाळायला हवा. मोहरी, सूर्यमुखी व शेंगदाणा तेलाचा वापर करायला हवा, असा सल्लाही यावेळी विशेषज्ञांनी दिला.

Web Title: Hypertension risk due to oily substances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य