नागपुरातील हॉस्पिटलच्या संपाला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:23 PM2018-07-17T22:23:07+5:302018-07-17T22:26:02+5:30

महानगरपालिकेच्या हॉस्पिटल रजिस्ट्रेशनमधील जाचक अटींना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिल्याने व महानगरपालिका आयुक्तांना पुणे व ठाणेच्या धर्तीवर हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन करण्याच्या सूचना दिल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) बुधवार १८ जुलै रोजी होणाऱ्या संपाला तूर्तास स्थगिती दिली आहे.

Hospital's strike deferred in Nagpur | नागपुरातील हॉस्पिटलच्या संपाला स्थगिती

नागपुरातील हॉस्पिटलच्या संपाला स्थगिती

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन : रजिस्ट्रेशनच्या जाचक अटीला घेऊन बसणार समिती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगरपालिकेच्या हॉस्पिटल रजिस्ट्रेशनमधील जाचक अटींना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिल्याने व महानगरपालिका आयुक्तांना पुणे व ठाणेच्या धर्तीवर हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन करण्याच्या सूचना दिल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) बुधवार १८ जुलै रोजी होणाऱ्या संपाला तूर्तास स्थगिती दिली आहे.
‘मुंबई नर्सिंग अ‍ॅक्ट एम ५९’मधील जाचक अटी व शर्तीमुळे खाटांची सुविधा असणाऱ्या हॉस्पिटलसाठी महापालिकेमध्ये रजिस्ट्रेशन करणे कठीण झाले आहे. याच्या विरोधात शहरातील खासगी हॉस्पिटल संचालकांनी ‘आयएमए’च्या नेतृत्वात बुधवारी एक दिवसीय संप करण्याची तयारी केली होती. परंतु मंगळवारी या विषयाला घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठक बोलवली. ही बैठक आमदार डॉ. मिलिंद माने यांच्या नेतृत्वात झाली. यावेळी आयएमए राज्याचे अध्यक्ष डॉ. वाय. एस. देशपांडे, नागपूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. आशिष दिसावल, डॉ. अभिजित अंभईकर, डॉ. विंकी रुघवानी, डॉ. अनिल लद्धड, डॉ. कृष्णा पराते व डॉ. प्रकाश देव उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळाने हॉस्पिटल परवाना नुतनीकरणाच्या सर्व जाचक अटींबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. डॉ. दिसावल यांनी ‘लोकमत’ला सांगितले, मनपाच्या जाचक अटींमुळे ७० ते ८० हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन रखडले आहे. परिणामी, त्यांना मृत्यू प्रमाणपत्र देण्यापासून ते विम्याचे ‘क्लेम’ करणेही अडचणीचे जात आहे. याला घेऊन आम्ही संपाची हाक दिली होती. विशेष म्हणजे, ‘चेंज आॅफ युज’मुळे जुने हॉस्पिटल अडचणीत आले आहे. परंतु पुणे आणि ठाण्यामध्ये तेथील मनपा आयुक्तांनी मधला मार्ग काढीत हॉस्पिटलांचे रजिस्ट्रेशन केले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी याला गंभीरतेने घेत नागपूरच्या मनपा आयुक्तांशी फोनवर चर्चा केली. तसेच जाचक अटींना घेऊन समिती स्थापन करून तातडीने निर्णय घेण्याचा सूचनाही दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे तूर्तास संप मागे घेण्यात आला आहे. परंतु सप्टेंबरपर्यंत सर्व हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन न झाल्यास संपाचे हत्यार उपसण्यात येईल, असेही डॉ. दिसावल म्हणाले.

Web Title: Hospital's strike deferred in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.