मोतीबाग क्रीडा मैदानावरुन ‘हेरिटेज वॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:30 AM2019-02-08T00:30:51+5:302019-02-08T00:33:31+5:30

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत मोतीबाग येथील नॅरोगेज रेल्वे संग्रहालयाच्या नॅरोगेज रेल्वे सिस्टीमशी संबंधित मॉडेल, जुन्या काळात कार्यरत लोको, कोच, वॅगन आदीबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले.

Heritage Walk on MotiBagh sports ground | मोतीबाग क्रीडा मैदानावरुन ‘हेरिटेज वॉक’

मोतीबाग क्रीडा मैदानावरुन ‘हेरिटेज वॉक’

Next
ठळक मुद्देनॅरोगेज रेल्वेबाबत जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्यानागपूर विभागांतर्गत मोतीबाग येथील नॅरोगेज रेल्वे संग्रहालयाच्या नॅरोगेज रेल्वे सिस्टीमशी संबंधित मॉडेल, जुन्या काळात कार्यरत लोको, कोच, वॅगन आदीबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे फेब्रुवारीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांच्या नेतृत्वात गुरुवारी सकाळी ८ वाजता हेरिटेज वॉकचे आयोजन वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता गुंजन वासनिक यांनी केले. मोतीबाग क्रीडा मैदानापासून हेरिटेज वॉकला सुरुवात झाली. कडबी चौक येथील मोतीबाग नॅरोगेज रेल्वे संग्रहालय येथे हेरिटेज वॉकचा समारोप झाला. हेरिटेज वॉकमध्ये सर्व विभागाचे शाखा अधिकारी, कर्मचारी, रेल्वे कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयांसह २०० नागरिक सहभागी झाले होते. हेरिटेज वॉकच्या माध्यमातून बॅनर, स्लोगनच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे आवाहन करण्यात आले. सोबतच मोतीबाग रेल्वे संग्रहालयातील ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी अधिकाधिक संख्येने भेट देण्याचे आवाहन करण्यात आले. याशिवाय ९ आणि १० फेब्रुवारीला हेरिटेज कार्यक्रमांतर्गत हेरिटेज फिल्म शो, १६ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांसाठी प्रश्न मंजुषा स्पर्धा, २३ फेब्रुवारीला मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यता आली आहे.

Web Title: Heritage Walk on MotiBagh sports ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.