मुख्याध्यापकाने बायकोला हाताशी धरून केला शासकीय निधीचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 08:57 PM2019-06-25T20:57:15+5:302019-06-25T21:00:37+5:30

शासनाकडून मिळणाऱ्या वेतनेतर अनुदानाची रक्कम शाळेच्या मुख्याध्यापकाने परस्पर काढून शासकीय निधीचा अपहार केला. विशेष म्हणजे संस्थेमध्ये त्यांची पत्नी कुठल्याही पदावर नसताना सचिव दाखवून बँकेचे सर्व व्यवहार परस्पर केले. संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांची दिशाभूल करून ६ लाख ८६ हजार रुपये गबन केले.

Headmaster with wife fraud government funds | मुख्याध्यापकाने बायकोला हाताशी धरून केला शासकीय निधीचा अपहार

मुख्याध्यापकाने बायकोला हाताशी धरून केला शासकीय निधीचा अपहार

Next
ठळक मुद्देसंस्थेला मिळणारे वेतनेतर अनुदान परस्पर काढले : अध्यक्ष, सचिवाची केली दिशाभूल

लोकमत न्यूज नेटवर्क  
नागपूर : शासनाकडून मिळणाऱ्या वेतनेतर अनुदानाची रक्कम शाळेच्या मुख्याध्यापकाने परस्पर काढून शासकीय निधीचा अपहार केला. विशेष म्हणजे संस्थेमध्ये त्यांची पत्नी कुठल्याही पदावर नसताना सचिव दाखवून बँकेचे सर्व व्यवहार परस्पर केले. संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांची दिशाभूल करून ६ लाख ८६ हजार रुपये गबन केले.
प्रकरण नवजीवन शिक्षण संस्था रामटेक येथील आहे. संस्थेचे अध्यक्ष विष्णूपंत किंमतकर व सचिव बाबुराव रहाटे आहेत. २०१५ पासून संस्थेला वेतनेतर अनुदान शासनाकडून प्राप्त झाले. या रकमेच्या चौकशीसाठी संस्थेच्या अध्यक्षांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात चौकशी केली असता अनुदानाची रक्कम युनियन बँकेच्या रामटेक शाखेत जमा केली असल्याचे सांगण्यात आले. युनियन बँकेत चौकशी केली असता कळले की, शाळेचे मुख्याध्यापक अशोक सातपुते हे बँकेचे खाते हाताळत होते. नियमाप्रमाणे वेतनेतर अनुदान हे संस्थेचे अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्या संयुक्त खात्यात जमा व्हायला पाहिजे. परंतु मुख्याध्यापकांनी स्वत:च्या पत्नीला संस्थेच्या सचिव दाखवून, त्यांच्या स्वाक्षरीने खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे बँकेत खाते उघडले. विशेष म्हणजे वेतनेतर अनुदानाचे खाते सुरू करताना शेड्यूल वन जोडणे आवश्यक असते. पण बँकेने चौकशी न करता, खाते उघडले. २०१५ ते २०१९ या कालावधीत या खात्यातून लाखो रुपये काढण्यात आले. मुख्याध्यापक सातपुते व त्यांच्या कुटुंबाने ६,८६,७५७ रुपये गबन केल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष विष्णूपंत किंमतकर व सचिव हरीशचंद्र रहाटे यांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यध्यापकांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Headmaster with wife fraud government funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.