'Hashtag me-2' made for women of Nagpur | ‘हॅशटॅग मी टू’ नागपूरच्या महिलांना केले जागृत

ठळक मुद्देआणखी हवेत प्रयत्न शहरात घरगुती हिंसेच्या २३०३ तक्र ारींची नोंद

अंकिता देशकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: घरगुती हिंसाचार अधिनियम हा भारतातील स्त्रियांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होय. एक स्त्री विविध भूमिका यशस्वीरीत्या पार पाडते पण तीच स्त्री तिच्या घरात मात्र अनेकदा सुखरूप नसते. आधी अनेक महिला हा कौटुंबिक हिंसाचार सहन करायच्या. परंतु आता जागतिक पातळीवर ‘हॅशटॅग मी टू’ ही चळवळ सुरू झाली आणि बऱ्याच महिलांनी त्यांच्यासोबत होणाऱ्या हिंसाचाराला जगासमोर मांडले. आपल्या नागपुरातही घरगुती हिंसेच्या २३०३ तक्रारींची नोंद झाली आहे.
भरोसा सेलमध्ये कार्यरत पोलीस निरीक्षक मीना जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात २०१७ साली, घरगुती हिंसेच्या एकूण २३०३ तक्रारी नोंदविल्या गेल्या आहेत. त्यातील ३२० तक्रारी डोमेस्टिक व्हॅयलेन्स कायद्या अंतर्गत पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आल्या आहेत. तसेच ८८१ महिलांनी तडजोड करून आपल्या संसाराला पुनश्च शुभारंभ केला आहे.
उरलेल्या तक्रारींबाबत कायदेशीर उपाय काढण्यात आले. कुणाला संरक्षण दिले तर कुणाचे घरातच पुनर्वसन करण्यात आले.
भरोसाच्या समुपदेशक, संगीता ढोमणे सांगतात, 'अनेक कौटुंबिक हिंसेचा परिणाम इतका भंयकर असतो की त्या महिलेला कायमस्वरूपी नैराश्य येऊ शकते. नोंद झालेल्या तक्रारींमध्ये नैराश्याचे प्रमाण ८ ते १० टक्के असे आढळले आहे. असे अनेक प्रसंग येतात जेव्हा समुपदेशन करताना जाणवते की त्या महिलेला त्वरित उपाय हवाय. कौटुंबिक हिंसेने ग्रासलेल्या महिला या फक्त अशिक्षितच असतात असे नाही तर बऱ्यांचदा त्या उच्चशिक्षित, परदेशी राहून शोषण सहन करणाऱ्यां देखील असतात. आजच्या पिढीत कौटुंबिक हिंसेला घेऊन बरीच जागरूकता आलीय. पण कुठे ना कुठे या समस्येला मुळापासून उपटून काढायचं असेल तर शिक्षण हा एकाच मार्ग आहे, असे मत देखील जगताप यांनी मांडले.


Web Title: 'Hashtag me-2' made for women of Nagpur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.