अर्धे नागपूर शहर अंधारात : वीज वितरण यंत्रणा ठरली फेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:54 AM2018-05-27T01:54:53+5:302018-05-27T01:55:06+5:30

शनिवारी सायंकाळी नागपूर शहर व जिल्ह्यात वादळी पावसाने थैमान घातले. शहर व जिल्ह्यातील अनेक भागात वीज वाहिन्यांवर ठिकठिकणी झाडे पडल्याने वीजवाहिन्या तुटून विजेचे खांब कोसळले. परिणामी अर्धे शहर अनेक तास अंधारात होते. यात वीज वितरण यंत्रणा पूर्णत- फेल ठरली. मान्सूनपूर्व केलेल्या तयारीचेही पितळ उघडे पडले.

Half of the city of Nagpur, in the darkness: electricity distribution system failed | अर्धे नागपूर शहर अंधारात : वीज वितरण यंत्रणा ठरली फेल

अर्धे नागपूर शहर अंधारात : वीज वितरण यंत्रणा ठरली फेल

Next
ठळक मुद्देमान्सूनपूर्व तयारी पडली उघडी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शनिवारी सायंकाळी नागपूर शहर व जिल्ह्यात वादळी पावसाने थैमान घातले. शहर व जिल्ह्यातील अनेक भागात वीज वाहिन्यांवर ठिकठिकणी झाडे पडल्याने वीजवाहिन्या तुटून विजेचे खांब कोसळले. परिणामी अर्धे शहर अनेक तास अंधारात होते. यात वीज वितरण यंत्रणा पूर्णत- फेल ठरली. मान्सूनपूर्व केलेल्या तयारीचेही पितळ उघडे पडले.
सायंकाळी पावसाला सुरुवात होताच एक-एक फिडर बंद पडू लाले. महावितरणच्या काँग्रेस नगर डिव्हीजनमधील नरेंद्रगर, रिंग रोडसह एसएनडीएलचे बहुतांश भाग अंधारात डुबले होते. तुकडोजी पुतळा, मानेवाडा, रेशीमबाग गणेशनर, बगडगंज, आयुर्वेदिक ले-आऊट, उमरेड रोड, पारडी, वाठोडा, उप्पलवाडी, एस.टी. स्टँड, गांधीबग, गोरेवाडा, बोरगाव, ओंकारनगर, बेसा, जाफरनगर, केटीनगर, हरीहर मंदिर, मॉडेल मिल, अनमोलनगर, क्लॉर्क टाऊन आदी परिसर अंधरात होते. दक्षिण नागपूर तर पूर्णत:च अंधारात होते. अनेक तासांपासून वीज नसल्याने नागरिकही संतापले होते. या संतापाचा भडका वितरण कंपनीच्या अनेक कार्यालयाबाहेर दिसून आला. मानेवाडा चौकातील कार्यालयाबाहेर नागरिक एकत्र आले होते. पोलिसांना बोलवावे लागले होते. वीज वितरण व्यवस्था तातडीने दुरुस्त न झाल्यास रविवारी संतप्त नागरिकांचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वीज ग्राहकांनी संयम राखवा
शहर व जिल्ह्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी कर्मचारी अभियंते प्रयत्न करीत आहे. पावसाचा जोर कमी होताच युद्धस्तरार काम करीत अनेक भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. अजूनही ते केले जात आहे. पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरु करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. दरम्यान नागरिकांनी संयम राखून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
... तर अधिकाऱ्यांना सोडणार नाही
पावसाळ्यात वीज जाऊ नये यासाठी मान्सूनपूर्व तयारी करून घ्यावी, यासाठी १५ दिवसांपूर्वीच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात धोकादायक वृक्षांची कटाई, छाटणी आदी कामे करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु आजची परिस्थिती पाहता ती कामे झालीच नसल्याचे दिसून येते. आमदारांनी निर्देश देऊनही कामे होत नाही हे गंभीर आहे. शनिवारी संपूर्ण दक्षिण नागपूर अंधारात होते. ठिकठिकाणी झाडे पडल्यान विजेच्या तारा तुटल्या होत्या. नागरिक संतप्त . सातत्याने फोनवर फोन येत होते. तब्बल ५२ फिडर बंद पडल्याचे सांगितले जात होते. पावसाळ्यापूर्वीच असे हाल असतील तर पावसाळ्यात काय होणार? तातडीने वीज पुरवठा झाला नाही. आणि यंत्रणा सुधारली ही, तर कुणालाही सोडणार नाही. गंभीर परिणाम भोगावे लागतील.
आ. सुधाकर कोहळे
दक्षिण नागपूर

 

Web Title: Half of the city of Nagpur, in the darkness: electricity distribution system failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.