ठळक मुद्देलोकमत व राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचे आयोजन : धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मध्य भारतात दुर्गा उत्सवाचे भव्यदिव्य आयोजन लक्ष्मीनगर येथे राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळातर्फे करण्यात येणार आहे. या आयोजनाला लोकमतचेही सहकार्य लाभले आहे. या महोत्सवात धार्मिक, सांस्कृतिक व बौद्धिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. विशेष आकर्षण म्हणजे महोत्सवाच्या स्थळी लायटिंगद्वारे आयफेल टॉवरची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे.
राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचे हे बारावे वर्ष आहे. मंडळाद्वारे दरवर्षी लक्ष्मीनगरमध्ये भव्य आयोजन करण्यात येते. या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक कार्यही मंडळाद्वारे करण्यात येते. यावर्षी मंडळाने भव्यदिव्य आयोजनाचा निर्णय घेतला आहे. मंडळाद्वारे साकारण्यात येणाºया दुर्गेच्या मूर्तीची निर्मिती गंगा नदीच्या मातीतून करण्यात येणार आहे. मूर्ती बनविणारे कलावंत खास कोलकाता येथून बोलाविण्यात आले आहे. आयोजन स्थळावर ‘माझी मेट्रो’ या संकल्पनेवर स्वयंचलित मेट्रोची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. येणाºया भाविकांना भविष्यात शहरात धावणाºया मेट्रोचे फिल येथे अनुभवायला मिळणार आहे. त्याचबरोबर क्रांतिकारी भगतसिंग यांच्या जीवनावरील दुर्मिळ छायाचित्रांची प्रदर्शनी आयोजनस्थळी लावण्यात येणार आहे. याचबरोबर दुर्गा उत्सवाचे नऊ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा होणार आहे. घटस्थापना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी खासदार विजय दर्डा यांच्या उपस्थितीत होणार आहे. २३ सप्टेंबरला नृत्यस्वरूप संत ज्ञानेश्वर यांच्यावर सोनिया परचुरे व त्यांची चमू नृत्यनाटिका सादर करणार आहे. २४ सप्टेंबरला सावनी रवींद्र यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. २५ सप्टेंबरला विजय रमण यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. २७ सप्टेंबरला राहुल सोलापूरकर यांचे प्रतापसूर्य बाजीराव यांच्यावर विशेष प्रबोधन होणार आहे. तर २८ सप्टेंबरला अनुप जलोटा यांची भजनसंध्या आयोजित केली आहे. मंडळातर्फे दरवर्षी सामाजिक कार्यसुद्धा करण्यात येते. वृद्धाश्रम, अनाथालय यांना मदत करण्यात येते. मनपाच्या २५ शाळा मंडळातर्फे डिजिटल करण्यात आल्या आहे. पोलीस विभागाला १७०० तर रेल्वेत खलासी काम करणाºया कर्मचाºयांना १५० रेनकोटचे वितरण करण्यात आले आहे.
धार्मिक, सांस्कृतिक व बौद्धिक संगम साधण्याचा प्रयत्न
दुर्गेचा उत्सव धार्मिक असला तरी या महोत्सवात आम्ही धार्मिक, सांस्कृतिक व बौद्धिक संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे. देशभक्तीची भावना निर्माण करणारे कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आले आहेत. समाजात एकोपा निर्माण व्हावा, हा मंडळाचा उद्देश आहे. या माध्यमातून एक सामाजिक चळवळ निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- प्रसन्न मोहिले,
संस्थापक अध्यक्ष, राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळ