गुड बोला.. गोड बोला..; माझ्यातील लहान मूल जिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 10:02 AM2019-01-18T10:02:43+5:302019-01-18T10:03:26+5:30

सडेतोड पण मनमिळावू, उद्यमशील पण मदतीला नेहमीच तत्पर, झटपट निर्णयासोबत दूरदृष्टिता राखणारे, केवळ नागपूर, विदर्भच नव्हे तर देशाच्या गळ्यातले ताईत बनलेले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, मकरसंक्रांतीच्या मंगलपर्वावर लोकमतच्या वाचकांशी हितगूज साधत आहेत.. त्यांचा हा शब्दरुपी तिळगूळ..

Good talk .. talk sweet ..; The little baby alive in me | गुड बोला.. गोड बोला..; माझ्यातील लहान मूल जिवंत

गुड बोला.. गोड बोला..; माझ्यातील लहान मूल जिवंत

Next
ठळक मुद्देतुमचे मन लहान मुलासारखे निर्मळ आणि निष्पाप असले पाहिजे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:
आयुष्यात ताणतणाव असणारच. संकटही येत राहणार. पण म्हणून माणसाने आपला मूळ स्वभाव विसरू नये. इतरांशी प्रेमाने बोलणे, त्याच्या सुख-दु:खात सहभागी होणे, त्याचा आनंद आपला मानणे हीच मानवी स्वभावातील मूळ वृत्ती आहे. हे वरदान निसर्गाने इतर सजीवांना दिलेले नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकाच्या आनंदात आपण सहभागी झालो पाहिजे, प्रत्येकाला मदत केली पाहिजे.
स्पष्ट बोलतो, अनेकदा ते परखडही असते. खरे बोलणे कटू असू शकते पण त्यात निष्पापपणा जास्त असतो. त्यामुळे मी कुणावर रागावलोही तरी दुसऱ्याच क्षणी शांत होतो. त्यामुळे माझे रागावणे कुणाला टोचत नाही. आता या स्वभावाची सर्वांनाच सवय झाली आहे. पण मी कधी कुणाचा मत्सर करीत नाही. माझ्या मनात कुणाबद्दल द्वेषाची भावनाही येत नाही. आपल्याकडे येणाºया प्रत्येक माणसाला आपण काहीतरी दिले पाहिजे ही शिकवण मला माझ्या आईने दिली.
ती नेहमी सांगायची, ‘आपल्या दातृत्वाची आपण वहीत नोंद करून ठेवू नये. त्यामुळे अहंकार निर्माण होतो’. एकदा अहंकार निर्माण झाला की मग द्वेष, मत्सर हे रोग आपल्या मनाला जडतात. नंतर शरीरालाही चिकटतात. मला ताण-तणाव येत नाही, असे नाही. तो स्वाभाविक भाग आहे. पण असे झाले की मी गाणे ऐकतो, गुणगुणतोही. चित्रपट बघायला मला आवडतात. पण व्यस्ततेमुळे ते अनेकदा शक्य होत नाही. माणसाने आपली पदप्रतिष्ठा विसरायला हवी. त्यामुळे आपले पाय जमिनीवर राहतात. हा एक प्रकारचा योग आहे. मी तो रोज करतो. माझा नातू निनाद परवा मला आईस्क्रीम खायला घेऊन गेला. दिवाळीत त्याने ‘आबा, तुम्हीच मला फटाके घेऊन द्या, असा हट्ट धरला. तो मी पूर्णही केला. त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच माझ्या जगण्याचे समाधान होते. तुमचे मन लहान मुलासारखे निर्मळ आणि निष्पाप असले पाहिजे. माझ्यातील लहान मूल मी अजूनही जपले आहे.
या लहान मुलाला प्रत्येक गोष्टीचे कुतुहल असते. मी कुठे गेलो की माझ्यातील हे लहान मूल काहीतरी नवीन गोष्ट शोधत असते आणि शिकवतही असते. आयुष्यात म्हणूनच मी कधी निराश होत नाही. मला माझ्या जगण्याचे प्रयोजन सापडले आहे. त्यामुळे राजकारणात असूनही मी समाधानी आहे. त्या अर्थाने मी आनंदी, सुखी, समाधानी...

Web Title: Good talk .. talk sweet ..; The little baby alive in me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.