पाकिस्तानातील निर्वासित हिंदूंना भारताचे नागरिकत्व द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 10:18 PM2018-04-21T22:18:53+5:302018-04-21T22:19:06+5:30

पाकिस्तानातील हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. बळजबरीने धर्मांतर, प्राणघातक हल्ले, महिलांवर अत्याचार होत असून पाकिस्तानातील अशा निर्वासित हिंदूंना भारताचे नागरिकत्व द्या आणि इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने झांशी राणी चौकात शासनाच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली.

Give Indian citizenship to refugees Hindus in Pakistan | पाकिस्तानातील निर्वासित हिंदूंना भारताचे नागरिकत्व द्या

पाकिस्तानातील निर्वासित हिंदूंना भारताचे नागरिकत्व द्या

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय हिंदू आंदोलन : झांशी राणी चौकात निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : पाकिस्तानातील हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. बळजबरीने धर्मांतर, प्राणघातक हल्ले, महिलांवर अत्याचार होत असून पाकिस्तानातील अशा निर्वासित हिंदूंना भारताचे नागरिकत्व द्या आणि इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने झांशी राणी चौकात शासनाच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली.
झांशी राणी चौकात मंगला पागनीस, अभिजित पोलके, रमेश अगरवाल यांच्या नेतृत्वात आंदोलन करून शासनाच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. आंदोलनात पाकिस्तानातील निर्वासित हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी त्यांना भारताचे नागरिकत्व देण्याची मागणी करण्यात आली. हिंदू मंदिरातील पैसा सामूहिक विवाह सोहळ्यांवर नव्हे तर धर्म कार्यासाठीच वापरण्यात यावा, अशी भूमिका मांडण्यात आली. याशिवाय तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी लिंगायत धर्म तयार करावा असा घातलेला घाट चुकीचा असून हिंदू धर्मापासून लिंगायत समाज वेगळा करण्याला विरोध दर्शविण्यात आला. तेलंगणाचे आमदार राजासिंग ठाकूर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध करून हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी करून या मागे हिंदू नेत्यांना मारण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप आंदोलनादरम्यान करण्यात आला. याबाबत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. आंदोलनात मंगला पागनीस, अभिजित पोलके, रमेश अगरवाल यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Give Indian citizenship to refugees Hindus in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.