केरोसीन परवानाधारकांना २० हजार रुपये मानधन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 09:48 PM2018-07-16T21:48:09+5:302018-07-16T21:52:04+5:30

केरोसीन विक्रेत्यांना एक लिटरच्या मागे केवळ २२ पैसे कमिशन मिळते. परिणामी, केरोसीन विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. केरोसीन परवानाधारकांना २० हजार रुपये मानधन द्या, या मागणीला घेऊन केरोसीन हॉकर्स व रिटेलर्स फेडरेशनने विधिमंडळावर मोर्चा काढून इतरही मागण्या रेटून धरल्या.

Give 20 thousand rupees remuneration to kerosene licensees | केरोसीन परवानाधारकांना २० हजार रुपये मानधन द्या

केरोसीन परवानाधारकांना २० हजार रुपये मानधन द्या

googlenewsNext
ठळक मुद्देकेरोसीन हॉकर्स व रिटेलर्स फेडरेशनचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केरोसीन विक्रेत्यांना एक लिटरच्या मागे केवळ २२ पैसे कमिशन मिळते. परिणामी, केरोसीन विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. केरोसीन परवानाधारकांना २० हजार रुपये मानधन द्या, या मागणीला घेऊन केरोसीन हॉकर्स व रिटेलर्स फेडरेशनने विधिमंडळावर मोर्चा काढून इतरही मागण्या रेटून धरल्या.
मोर्चाचे नेतृत्व करणारे बाबुराव मेश्राम म्हणाले, राज्यातील केरोसीन विक्रेत्यांचा मासिक कोठा ८ ते २५ आणि ३० ते १०० लिटरपर्यंत कमी करण्यात आला आहे. यातच कमिशन नाममात्रच असल्याने केरोसीन विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून मोर्चा काढला जात आहे, परंतु आश्वासनापलीकडे काही मिळत नसल्याचेही मेश्राम म्हणाले.
या मोर्चाचे नेतृत्व बाबुराव मेश्राम, अनिल हिरकने आदींनी केले.

Web Title: Give 20 thousand rupees remuneration to kerosene licensees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.