नागपुरात कारमध्ये सामूहिक बलात्काराचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 09:45 PM2019-02-16T21:45:08+5:302019-02-16T21:46:09+5:30

मैत्रिणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्याच्या प्रयत्नात जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी झालेल्या विलंबाचा लाभ उठवत आरोपींनी त्यात अटकपूर्व जामिन मिळवून आपली मानगुट सोडवून घेण्यात यश मिळवले आहे.

Gang rape attempt in car in Nagpur | नागपुरात कारमध्ये सामूहिक बलात्काराचा प्रयत्न

नागपुरात कारमध्ये सामूहिक बलात्काराचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्देजरीपटक्यात गुन्हा दाखल : आरोपींनी मिळवला अटकपूर्व जामीन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मैत्रिणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्याच्या प्रयत्नात जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी झालेल्या विलंबाचा लाभ उठवत आरोपींनी त्यात अटकपूर्व जामिन मिळवून आपली मानगुट सोडवून घेण्यात यश मिळवले आहे.
बल्लू केवलरामानी (वय ५३, रा. कृष्णा अपार्टमेंट, कडबी चौक), ऋषि खोसला (वय ४८, रा. बैरामजी टाउन, सदर) आणि मुन्ना ढोले (वय ५०, रा. राज नगर) अशी या खळबळजनक प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.
बल्लू केवलरामानीचे धंतोलीत कॉम्प्युटरचे सिल्वर सिस्टीमच्या नावाने शोरूम असून तो काही राजकीय नेत्यांसोबतही घसट ठेवून आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रार करणा-या ४८ वर्षीय महिलेसोबत त्याचे अनेक दिवसांपासून मधूर संबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बल्लूचे लक्ष दुसरीकडे केंद्रित झाल्यामुळे महिलेसोबत त्याने अंतर राखणे सुरू केले होते.त्यामुळे महिलेने त्याच्यावर पाळत ठेवली होती. व्हॅलेंटाईन डे ला त्याने दुसरीकडेच कार्यक्रम बनविल्याची माहिती कळाल्याने महिलेने त्याला व्हॅलेंटाईन डे च्या कार्यक्रमासंबंधी विचारणा केली. बल्लूने टाळटाळ सुरू केल्याने त्यांच्यात दिवसभर आॅनलाईन वाद रंगला. नंतर बुधवारी रात्री ती १० च्या सुमारास ती त्याच्या घरी धडकली. ते पाहून बल्लू कारमध्ये बसून तिच्याशी चर्चा करू लागला. त्यांच्यातील संवादाने वादाचे रुप घेतले. तेवढ्यात बल्लूने खोसला आणि ढोलेला फोन करून बोलवून घेतले. हे दोघे सरळ कारमध्ये शिरले आणि नंतर तिघांनीही त्या महिलेवर कारमध्येच सामुहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने तीव्र प्रतिकार करून आरडाओरड करीत कसेबसे कारचे दार उघडले आणि सरळ घराकडे पळ काढला. त्यानंतर तिने गुरुवारी जरीपटका पोलिसांकडे तक्रार नोंदवली. विशेष म्हणजे, तीनही आरोपींचे शहरातील अनेक धनिक मंडळीसोबत निकटचे संबंध असल्याने त्यांना वाचविण्यासाठी जरीपटक्यातील काही स्वयंकथित नेते जरीपटका ठाण्यात पोहचले. त्यांनी महिलेचे मन वळवून तिला तक्रार देण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. पोलिसांवरही दडपण वाढवले. यात संपूर्ण दिवस गेला. महिलेने दबाव झुगारून तक्रार नोंदविण्यावर भर दिला. त्यात तेथे काही पत्रकारही पोहचले.
त्यामुळे पोलिसांनी अखेर गुरुवारी उशिरारात्री या संबंधात बल्लू केवलरामाणी, ऋषि खोसला तसेच मुन्ना ढोलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल करूनही पोलिसांनी अटकेची तत्परता दाखवली नाही. त्यामुळे आरोपींनी अटकपूर्व जामिन मिळवण्यात यश मिळवले.
सीसीटीव्हीकडे लक्ष !
महिलेची तक्रार खोटी असल्याचा कांगावा आरोपी आणि त्यांच्या साथीदारांकडून करण्यात आला होता. तो मुद्दा धरून पोलिसांनी घटनास्थळावरच्या सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले. मात्र, त्यात बिघाड झाल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी ते तज्ज्ञांकडे दिले. हे लॉक झालेले फुटेज २४ तासात उघडले जाईल, असे तज्ज्ञांनी सांगितले होते. त्यानुसार, २४ तास शनिवारी पूर्ण झाले. त्यात काय आहे, ते अद्याप कळू शकले नाही, असे जरीपटक्याचे ठाणेदार पराग पोटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

 

 

Web Title: Gang rape attempt in car in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.