नागपुरातील सहकारनगर घाटावर टॉर्चच्या प्रकाशात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:00 PM2019-03-14T23:00:25+5:302019-03-14T23:01:36+5:30

स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत मेट्रो धावायला लागली आहे. स्मार्ट सिटीत नागरिकांना स्मार्ट दर्जाच्या मूलभूत सुविधा मिळतील, असा दावा के ला जात आहे. अशा सुविधा मिळतील की नाही, हे भविष्यातच कळणार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचा मतदार संघ असलेल्या सहकारनगर घाटावर सुविधांचा अभाव आहे. एवढेच नव्हे तर दिवे नसल्याने रात्रीच्या सुमारास मृताच्या नातेवाईकांना टॉर्चच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावे लागतात, हे वास्तव आहे.

Funeral in light of torch at Nagpur's Sahakarnagar Ghat | नागपुरातील सहकारनगर घाटावर टॉर्चच्या प्रकाशात अंत्यसंस्कार

नागपुरातील सहकारनगर घाटावर टॉर्चच्या प्रकाशात अंत्यसंस्कार

Next
ठळक मुद्देस्मार्ट उपराजधानीतील धक्कादायक प्रकार : पदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत मेट्रो धावायला लागली आहे. स्मार्ट सिटीत नागरिकांना स्मार्ट दर्जाच्या मूलभूत सुविधा मिळतील, असा दावा के ला जात आहे. अशा सुविधा मिळतील की नाही, हे भविष्यातच कळणार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचा मतदार संघ असलेल्या सहकारनगर घाटावर सुविधांचा अभाव आहे. एवढेच नव्हे तर दिवे नसल्याने रात्रीच्या सुमारास मृताच्या नातेवाईकांना टॉर्चच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावे लागतात, हे वास्तव आहे.
सहकारनगर घाटावरील पथदिवे गेल्या महिनाभरापासून बंद आहेत. अंत्यसंस्कारासाठी असलेल्या डोममध्ये रात्रीला अंधार असतो. यामुळे बॅटरीच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावे लागतात. गुरुवारी रात्री याचा प्रत्यय आला. रात्रीच्या सुमारास लोकांना अंधारातून मोबाईलच्या प्रकाशातून ये-जा करावी लागली. घाटाच्या बाजूला नाला वाहतो. घाटावर साफसफाई होत नसल्याने सापांचा वावर आहे. घाटावरील शेडमध्ये विषारी साप निघाला. यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांत घबराट पसरली होती. भीतीमुळे त्यांच्यात अस्वस्थता होती.
या घाटावर अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आजूबाजूला रेती, गिट्टी पसरली आहे. लोकांना उभे राहण्यासाठी जागा नाही. शेडची साफसफाई होत नसल्याने सर्वत्र घाण व कचरा साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. शौचालय नसल्याने अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना झाडांच्या आडोशाने लघुशंका करावी लागते. घाटावर पाण्याची सुविधा नसल्याने धार्मिक विधी करताना अडचणी येतात. यामुळे नागरिकांत प्रचंड रोष आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदार संघातील व महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोनच्या क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ३६ मध्ये हा घाट येतो. मुख्यमंत्र्यांच्या विधानसभा मतदार क्षेत्रातील विकास कामांसाठी शासनाकडून विशेष निधी दिला जातो. यातून १५० ते २०० कोटींची विकास कामे सुरू असून, विकासासाठी निधीची कमी नसल्याचा दावा महापालिकेतील पदाधिकारी करतात. असे असूनही सहकारनगर घाटाची मागील अनेक वर्षांपासून दुर्दशा का, असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे.
विशेष म्हणजे या प्रभागाचे नगरसेवक प्रकाश भोयर हे झोन सभापती आहेत. तर अ‍ॅड. मिनाक्षी तेलगोटे, अग्निशमन समितीचे सभापती लहुकुमार बेहते व पल्लवी श्यामकुळे असे प्रभागातील नगरसेवक आहे. सत्तापक्षाचे नगरसेवक असूनही आपल्याच प्रभागातील दहनघाटाकडे या सर्वांचे दुर्लक्ष कसे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
पाण्याची सुविधा नाही
घाटावर अंत्यसंस्काराचा विधी करताना पाण्याची गरज भासते. परंतु येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. हॅडपंप आहे. परंतु येथ सर्वत्र घाण पसरली आहे. बाजुचे कठडे तुटलेले असल्याने रात्रीच्या अंधारात खड्ड्यात पडून अपघात होण्याचा धोका आहे.
निर्णय झाला पण सुधारणा नाही
शहरातील दहन घाटावर सुविधांचा अभाव असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी असल्याने २०१४ मध्ये तत्कालीन महापौर प्रवीण दटके यांनी शहरातील घाटांचा पाहणी दौरा के ला होता. महापालिका प्रशासनाला दहन घाटांवर मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले होते. मात्र दिलेले निर्देश अंमलात आले नाही. आजही घाटावर सुविधांचा अभाव असल्याने मृतकांच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागतो. दहन घाटावर सुविधा उपलब्ध होत नसतील नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा कशा देतील असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Web Title: Funeral in light of torch at Nagpur's Sahakarnagar Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.