थॅलेसिमियाग्रस्तांना मोफत ‘नॅट टेस्टेड’ रक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:39 AM2017-08-22T00:39:23+5:302017-08-22T00:39:50+5:30

डॉ. हेडगेवार रक्तपेढीने नुकतेच रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्ताने समाजातील सर्व रुग्णांना विविध प्रकारच्या सवलती रक्तपेढी देणार आहे.

Free 'Nat Tested' blood for Thalesymia | थॅलेसिमियाग्रस्तांना मोफत ‘नॅट टेस्टेड’ रक्त

थॅलेसिमियाग्रस्तांना मोफत ‘नॅट टेस्टेड’ रक्त

Next
ठळक मुद्देहेडगेवार रक्तपेढीचा पुढाकार : रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. हेडगेवार रक्तपेढीने नुकतेच रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्ताने समाजातील सर्व रुग्णांना विविध प्रकारच्या सवलती रक्तपेढी देणार आहे. थॅलेसिमियाच्या ५२ रुग्ण रक्तपेढीने दत्तक घेतले आहे. या रुग्णांना दरमहा १०० ते १२५ रक्तपिशव्यांचे नि:शुल्क रक्तपुरवठा करते. आता या रुग्णांना मोफत ‘नॅट’(न्यूलिक अ‍ॅसिड अ‍ॅम्पलिफिकेशन टेक्नालॉजी) तपासलेले म्हणजे १०० टक्के सुरक्षित रक्त देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच इतर रुग्णांना ‘नॅट टेस्टेड’ रक्ताच्या किमतीमध्ये काही प्रमाणात सूटही देण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे सचिव अशोक पत्की यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
अशोक पत्की म्हणाले, नॅट टेस्टेड’ रक्तामुळे संक्र मणातून एचआयव्ही आणि कावीळ यासह अन्य विषाणूजन्य आजार होण्याचा धोका राहत नाही. या तंत्रज्ञानामुळे सुरक्षित रक्त मिळण्याची शाश्वती असते. यामुळेच एक सामाजिक जबाबदारी म्हणून थॅलेसिमियाच्या रुग्णांना हे रक्त मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच इतर रुग्णांसाठी नॅट टेस्टेड रक्ताचे दर कमी करून रुग्णांना दिलासाही दिला जाणार आहे. या रौप्यमहोत्सवात रक्तपेढीतर्फे महिलांचे रक्तदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. विदर्भात सहा ठिकाणी रक्त साठवणुकीची केंद्रे आहेत. लवकरच रामटेक, ब्रम्हपुरी, चंद्रपूर व नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, जामठा येथे साठवणूक केंद्र सुरू करण्यात येणार आहे. डॉ. हेडगेवार रक्तपेढी समाजाभिमुख रक्तपेढी आहे. यामुळे ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर काम करते, असेही ते म्हणाले.
पत्रपरिषदेत डॉ. विजयकुमार तुंगार, प्रकाश कुंटे, सुधीर बापट, प्रकाश कुंडले, मोहन गोखले, शंकरराव गद्रे, शंकरराव विंचूरकर, हरिभाऊ इंगोले, डॉ. कारगीरवार, डॉ. किशोर पंडित, प्रवीण पाटील उपस्थित होते.
सिकलसेल रुग्णांनाही मिळणार ‘नॅट टेस्टेड’ रक्त
एका प्रश्नाच्या उत्तरात अशोक पत्की म्हणाले, थॅलेसिमियाच्या रुग्णांसोबतच सिकलसेलच्या गरजू रुग्णांना ‘नॅट टेस्टेड’रक्त उपलब्ध करून देण्याचाही आमचा प्रयत्न राहणार आहे. परंतु थॅलेसिमियाच्या रुग्णांच्या तुलनेत या रुग्णांना कमी रक्त लागते. यामुळे थॅलेसिमियाच्या रुग्णांना प्राधान्य देण्यात आले आहे.

Web Title: Free 'Nat Tested' blood for Thalesymia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.