नागपुरात माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा पान टपरीचालकावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 01:12 AM2019-01-15T01:12:39+5:302019-01-15T01:17:14+5:30

हॉटेल सेंटर पॉईंटजवळ असलेल्या संतोष नामक पानटपरी चालकावर माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. सोमवारी रात्री १०.२० च्या सुमारास ही थरारक घटना घडली.

A former police officer's son in Nagpur assaulted by knife on Pantapari owner | नागपुरात माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा पान टपरीचालकावर चाकूहल्ला

नागपुरात माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा पान टपरीचालकावर चाकूहल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूरच्या हॉटेल सेंटर पॉईंटजवळील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हॉटेल सेंटर पॉईंटजवळ असलेल्या संतोष नामक पानटपरी चालकावर माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. सोमवारी रात्री १०.२० च्या सुमारास ही थरारक घटना घडली.
रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉईंटला लागून संतोषची पानटपरी आहे. दोन आठवड्यापूर्वी तेथे करण राजपूत नामक गुंड त्याच्या साथीदारासह आला होता. त्यावेळी त्यांच्यात पान-सिगारेटच्या बिलावरून वाद झाला आणि दोघांनीही एकमेकांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणात संतोषने पोलिसात धावही घेतली. मात्र, त्यावेळी करणचा पिता निवृत्त पोलीस अधिकारी तेथे आला. त्यानेही संतोषविरुद्ध तक्रार देण्याची भूमिका घेतली. पोलिसांनी दोघांच्याही तक्रारी स्वीकारून दोघांवरही गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतल्याने त्यांनी तक्रार देण्यास टाळले. तेव्हापासून करण राजपूत संतोषचा वचपा काढण्याच्या तयारीत होता. नेहमीप्रमाणे आज रात्री संतोष त्याच्या पानटपरीवर असताना अचानक करण राजपूत तेथे आला. तो बाजूच्या दारातून पानटपरीत शिरला आणि त्याने संतोषवर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. जखमी संतोषला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. माहिती कळताच सीताबर्डीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे आपल्या ताफ्यासह तेथे पोहचले. वृत्त लिहिस्तोवर आरोपी पोलिसांना सापडला नव्हता.
विशेष म्हणजे, करण राजपूत हा कुख्यात गुंड असून, त्याचे वडील निवृत्त पोलीस निरीक्षक आहे. वडिलांच्या भरवशावर तो गुन्हेगारी करतो. तर, वडीलही त्याच्या गुन्हेगारीला सहकार्य करीत असल्याचे अनेक गुन्ह्यातून स्पष्ट झाले आहे. करणने काही वर्षांपूर्वी शस्त्राच्या धाकावर रिझर्व्ह बँक चौकातील पेट्रोलपंप लुटला होता.

 

Web Title: A former police officer's son in Nagpur assaulted by knife on Pantapari owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.