माजी महापौर उमरेडकरला लाच घेताना पकडले, एसीबीची मानकापूरात कारवाई 

By ऑनलाइन लोकमत on Fri, November 10, 2017 9:20pm

भ्रष्ट पोलिसासोबत हातमिळवणी करून एका शेतमालकाला फसवणूक प्रकरणात कारवाईचा धाक दाखवून ४० हजारांची लाच मागणा-या माजी महापौर देवराव उमरेडकर तसेच मानकापूर पोलीस ठाण्यातील नायक विजय झोलदेव (वय ५२) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने जेरबंद केले.

नागपूर : भ्रष्ट पोलिसासोबत हातमिळवणी करून एका शेतमालकाला फसवणूक प्रकरणात कारवाईचा धाक दाखवून ४० हजारांची लाच मागणा-या माजी महापौर देवराव उमरेडकर तसेच मानकापूर पोलीस ठाण्यातील नायक विजय झोलदेव (वय ५२) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने जेरबंद केले. शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे पोलीसांत खळबळ उडाली आहे. 

मधूकर तिजारे (रा. मंगलधाम सोसायटी, अमरावती मार्ग) यांच्याविरोधात मानकापूर पोलीस ठाण्यात गोधनी येथील जमिनीच्या  करारात फसवणूक केल्यासंबंधाचा तक्रार अर्ज होता. त्याच्या चौकशीसाठी तिजारे यांना ६ नोव्हेंबरला मानकापूर ठाण्यात बोलविण्यात आले होते. बयान घेतल्यानंतर पोलीस नायक झोलदेव याने माजी महापौर उमरेडकरच्या माध्यमातून तिजारेंना निरोप पाठवला. ४० हजार रुपये दिल्यास पोलीस कोणतीच कारवाई करणार नाही. ज्याने तक्रार दिली त्याच्यासोबत पोलीस आपसी तडजोड (सेटलमेंट) करून देतील, असेही उमरेडकरने तिजारेंना सांगितले होते. ४० हजारांची रक्कम जास्त होत असल्यामुळे दोन हप्त्यात ही रक्कम द्या, असेही उमरेडकरने सूचविले होते. काही दोष नसताना लाच कशाला द्यायची, असा विचार करून तिजारेंनी एसीबीचे अधीक्षक पी. आर. पाटील  यांची भेट घेतली. पाटील यांनी तसेच उपअधीक्षक विजय माहुलकर यांच्या माध्यमातून शहानिशा करून घेतली. माजी महापौर उमरेडकर ४० हजारांच्या लाचेसाठी तिजारेंना सारखा त्रास देतो, असे स्पष्ट झाल्यानंतर एसीबीने कारवाईसाठी सापळा रचला. त्यानुसार,  लाचेचा पहिला हप्ता म्हणून २५ हजार रुपये देण्याची तयारी दाखवत शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास तिजारेंनी उमरेडकर तसेच झोलदेव यांच्याकडे गेले. तिजारेंना या दोघांनी पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर (पुलाजवळ) थांबवले. त्यानंतर प्रारंभी उमरेडकर आणि नंतर झोलदेव तेथे आला. या दोघांनी लाचेची रक्कम स्विकारताच बाजुलाच घुटमळत असलेल्या एसीबीच्या अधिकारी कर्मचारी यांनी उमरेडकर आणि झोलदेव यांना रंगेहात पकडले. मानकापूर ठाण्यात एसीबीची कारवाई झाल्याचे वृत्त पसरताच एकच खळबळ उडाली. या दोघांविरुद्ध मानकापूर ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. 

सप्ताह संपला अन्...

विशेष म्हणजे, भ्रष्टाचाराविरोधात एसीबीने आठवडाभर जागर केला. दोन दिवसांपूर्वीच हा सप्ताह संपला अन् ईकडे पोलीस नायकासह दोघे एसीबीच्या जाळळ्यात अडकले. या कारवाईमुळे राजकारणात पुढे पुढे करून दलाली करणा-याचेही पितळ उघडे पडले आहे. एसीबीचे अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक  फाल्गुन घोडमारे, नायक रवि डाहाट, मंगेश कळंबे, रितेश तिवारी यांनी ही कामगिरी बजावली.  

संबंधित

मोहम्मद अली रोडवरील दुकानावर बळजबरी ताबा करणारे दोघे गजाआड
जानोरी धान्य घोटाळा पूर्ववैमनस्यातून उघडकीस
गर्दीच्या ठिकाणी दागिने चोरणाºया महिलेकडून ११ तोळे सोने जप्त
‘माँ गायत्री मार्केटिंग’‘लकी ड्रॉ’च्या नावाखाली नऊ कोटींची फसवणूक
चारित्र्यावर संशय असल्याने, पतीने केली पत्नीची हत्या!

नागपूर कडून आणखी

पोटच्या मुलीसोबत कुकर्म करणाऱ्या  नराधम वडिलास मरेपर्यंत जन्मठेप
विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा पाठिंबा काँग्रेसला
स्वत:ची किडनी देऊन वडिलाने दिले मुलाला जीवनदान
लोणार पर्यटन विकासाकरिता ९३ कोटी रुपये मंजुर
धक्कादायक ! नागपुरात मेट्रोचा पिलर कोसळला

आणखी वाचा