नागपुरात अल झमझम वॉटर इंडस्ट्रीजसह पाच मालमत्ता जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:07 AM2018-09-18T00:07:52+5:302018-09-18T00:08:41+5:30

लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकीत असल्याने महापालिकेच्या आसीनगर झोनच्या पथकाने सोमवारी जुना कामठी रोडवरील अल झमझम वॉटर इंडस्ट्रीजसह पाच मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली.

Five assets seized in Al-Jhajjam Water Industry in Nagpur | नागपुरात अल झमझम वॉटर इंडस्ट्रीजसह पाच मालमत्ता जप्त

नागपुरात अल झमझम वॉटर इंडस्ट्रीजसह पाच मालमत्ता जप्त

Next
ठळक मुद्देमनपाची कारवाई : ९.११ लाखांचा मालमत्ता कर थकीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकीत असल्याने महापालिकेच्या आसीनगर झोनच्या पथकाने सोमवारी जुना कामठी रोडवरील अल झमझम वॉटर इंडस्ट्रीजसह पाच मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली.
कर व कर आकारणी विभागातर्फे मोठ्या थकबाकीदारांनी थकीत मालमत्ता कर न भरल्याने कराधान नियमान्वये मालमत्ता जप्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. जुना कामठी मार्गावरील सावरकर ले-आऊ ट येथील मो. अब्दुल रहीम मो. अब्दुल दयाल निझामुद्दीन याची अल झमझम वॉटर इंडस्ट्रीजवर २ लाख ५० हजार ११० रुपये मालमत्ता कर थकीत असल्याने हा कारखाना जप्त करण्यात आला. तसेच राणी दुर्गावती चौक येथील आदिवासी सोसायटी येथील आनंदराव वलकरे यांच्याकडे १ लाख ८९ हजार, वैशालीनगर येथील कुलसूम बानो मेनन यांच्या घरावर ८८ हजार ६९८ रुपये, अशोकनगर येथील अर्जुन सहारे यांच्याकडे १ लाख ३५ हजार ८६६ तर मानवनगर येथील निवासी प्रीतम कौर यांच्याकडे २ लाख ४७ हजार ७१३ रुपये थकीत असल्याने या सर्वांची मालमत्ता जप्त करण्यात आली.
जप्त करण्यात आलेल्या मालमत्ताधारकांनी पाच दिवसात थकबाकी न भरल्यास या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश राठोड यांनी दिली. जप्तीची कारवाई राजस्व निरीक्षक चंद्रशेखर मोहिते, राजेश कडबे, कर संग्राहक अरुण वैद्य आदींनी केली. जप्ती व लिलावाची कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी थकीत रक्कम भरावी, असे आवाहन महापालिकेच्या कर व कर संकलन विभागाने केले आहे.

Web Title: Five assets seized in Al-Jhajjam Water Industry in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.