नागपुरात कुख्यात गुंडाच्या घरासमोर गोळीबार; तीन जिवंत काडतूसे सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 02:49 PM2018-01-20T14:49:16+5:302018-01-20T14:49:38+5:30

वाडी भागातील कुख्यात गुंड भारत कुलदीप सहारे (वय २६) याच्या घरासमोर ८ ते ९ आरोपींनी शनिवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास गोळीबार केला. सहारे आणि त्याच्या साथीदारांनी हल्लेखोरांवर धाव घेतल्यामुळे ते चार दुचाक्यांवर पळून गेले.

Firing in front of the house of a notorious punk in Nagpur; Three live cartridges were found | नागपुरात कुख्यात गुंडाच्या घरासमोर गोळीबार; तीन जिवंत काडतूसे सापडली

नागपुरात कुख्यात गुंडाच्या घरासमोर गोळीबार; तीन जिवंत काडतूसे सापडली

Next
ठळक मुद्देवाडी भागातील थरार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाडी भागातील कुख्यात गुंड भारत कुलदीप सहारे (वय २६) याच्या घरासमोर ८ ते ९ आरोपींनी शनिवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास गोळीबार केला. सहारे आणि त्याच्या साथीदारांनी हल्लेखोरांवर धाव घेतल्यामुळे ते चार दुचाक्यांवर पळून गेले. या घटनेमुळे वाडी परिसरात खळबळ निर्माण झाली असून, उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
वाडी भागातील कुख्यात गुंड म्हणून भारत सहारे ओळखला जातो. तो आणि त्याचे सचिन तसेच सतीश नावाचे भाऊ आपापल्या परिवारासह एकत्र शिवाजीनगरातील (कंट्रोल वाडी) निवासस्थानी राहतात. सहारेची वाडी आणि आजुबाजूच्या परिसरात प्रचंड दहशत आहे. शुक्रवारी भारतची ३ वर्षीय पुतणी परी हिचा वाढिदवस होता. त्यामुळे संपूर्ण परिवार आणि मित्रमंडळीसह सहारे एका दर्गा परिसरात गेला होता. तिकडून उशिरा रात्री ते घरी परतले. रात्रीचे १२ वाजले होते. सहारेने त्याचा मित्र संदीप क्षीरसागर याचा वाढिदवस सुरू होत असल्यामुळे केक कापण्याची तयारी चालवली होती. केक कापल्यानंतर ही सर्व मंडळी घरात बसली. पहाटे १.३० ते १.४५ च्या सुमारास त्यांनी आपल्या टीव्हीवर घरासमोरच्या सीसीटीव्हीवर नजर टाकली तेव्हा त्यांना तीन ते चार दुचाक्यांवर आठ ते नऊ जण संशयास्पद अवस्थेत दिसले. त्यातील एक आरोपी सहारेच्या स्वीफ्ट कारवर (एमएच ४०/ एआर ३५८९) दगड मारून काच फोडण्याच्या तयारीत दिसल्याने सहारे, त्याचे भाऊ आणि राजा नेवारे, राहुल कडसुळे, पवन लांडगे तसेच जीवन मोहिते या साथीदारांसह हल्लेखोरांकडे धाव घेतली. त्यामुळे एका हल्लेखोराने पिस्तुलातून सहारेला धमकावत गोळी झाडली. त्यानंतर दुसरी गोळी झाडली आणि आरोपी तीन मोटरसायकल तसेच एका अ‍ॅक्टीव्हावर बसून पळून गेले. सहारेने या घटनेची माहिती नियंत्रण कक्ष तसेच वाडी पोलीस ठाण्यात कळविली. पहाटे २ च्या सुमारास पोलिसांचा ताफा सहारेच्या घरासमोर पोहचला. पोलिसांनी कारच्या आजूबाजूला शोधाशोध केली तेव्हा त्यांना दोन रिकामी आणि तीन भरलेली काडतूसे सापडली. पोलिसांनी ती जप्त केली. सहारेच्या तक्र ारीवरून पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरु द्ध गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Firing in front of the house of a notorious punk in Nagpur; Three live cartridges were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.