नागपूर मध्यवर्ती कारागृहातील गोदाम आगीत खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 08:18 PM2018-04-09T20:18:29+5:302018-04-09T22:51:22+5:30

नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहातील गोदामाला आज दुपारी २.४५ च्या सुमारास भीषण आग लागली. या गोदामात लाकडी फर्निचर, कैद्यांनी बनविलेल्या वस्तू, गणवेश, बूट व इतर साहित्य असा मोठा साठा आगीत जळून खाक झाला. महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या आठ गाड्यांनी रात्री ७.३० च्या सुमारास ही आग आटोक्यात आणली. आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Fire in Nagpur Central Jail ,godawn burnt | नागपूर मध्यवर्ती कारागृहातील गोदाम आगीत खाक

नागपूर मध्यवर्ती कारागृहातील गोदाम आगीत खाक

Next
ठळक मुद्देकैद्यांचे कपडे, फर्निचर व साहित्याचे नुकसानगोदाम परिसरात कैद्यांचे वास्तव्य नसल्याने मोठा अनर्थ टळला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहातील गोदामाला आज दुपारी २.४५ च्या सुमारास भीषण आग लागली. या गोदामात लाकडी फर्निचर, कैद्यांनी बनविलेल्या वस्तू, गणवेश, बूट व इतर साहित्य असा मोठा साठा आगीत जळून खाक झाला. महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या आठ गाड्यांनी रात्री ७.३० च्या सुमारास ही आग आटोक्यात आणली. आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
मध्यवर्ती कारागृहाच्या भिंतीबाहेर पालापाचोळा जाळण्यासाठी आग लावण्यात आली होती. हवेमुळे जळालेली ठिणगी पडून आतल्या गोडाऊनला आग लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु चौकशीनंतरच आगीचे कारण स्पष्ट होईल. गोदामात कापडाचे मोठमोठे ढीग असल्याने थोड्याच वेळात आग सर्वत्र पसरली. अग्निमाशक विभागाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्याला जवळपास पाच तास लागले. या कारागृहात २४०० कैदी आहेत. पण ज्या गोडाऊनमध्ये आग लागली त्या परिसरात कैद्यांचं वास्तव्य नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
आगीचा धूर दिसताच तुरुंग प्रशासनाने अग्निशामक विभागाला याची माहिती दिली. थोड्याच वेळात अग्निशामक विभागाच्या गाड्या कारागृहात पोहोचल्या. आठ गाड्यांच्या मदतीने जवानांनी ही आग आटोक्यात आणली. आग विझविण्यासाठी कारागृहाच्या परिसरात असलेल्या विहिरीवर पंप बसवून पाण्याचा वापर करण्यात आला. महापालिकेच्या अग्निशामक विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके, नरेंद्रनगर स्थानकाचे प्रमुख डी. एन. नाकोड यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी होते. ज्या गोडाऊनला आग लागली, त्यावर टिन असल्याने ती आग विझविण्यासाठी जवानांना चांगलीच कसरत करावी लागली.
आग विझविण्यासाठी कारागृह प्रशासनाकडे ठोस यंत्रणा नसल्याचे यानिमित्ताने पुढे आले. अग्निशामक विभागाच्या नियमानुसार नागपूर मध्यवर्ती कारागृहात आग विझविण्यासाठी यंत्रणा आहे किंवा नाही, याची तपासणी करण्याचीही गरज असल्याची चर्चा आहे.

Web Title: Fire in Nagpur Central Jail ,godawn burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.