ठळक मुद्देसुरक्षेत हयगय मानकापूरमध्ये घडला होता अपघात

आॅनलाईन लोकमत
नागपूर : बांधकामस्थळी झालेल्या अपघातानंतर मजुराचा मृत्यू झाल्यामुळे मानकापूर पोलिसांनी तेथील कंत्राटदाराविरु द्ध गुन्हा दाखल केला. प्रकरण तीन महिन्यांपूर्वीचे आहे.
सदिया हाऊसिंग सोसायटी न्यू मानकापूर येथे सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामस्थळी प्रतिक सुरणलाल खरे (वय ३६, रा. कस्तुरबानगर, जरीपटका) हा मजूर काम करत होता. ११ जुलै २०१७ ला दुपारी १ वाजता तो उंच ठिकाणी काम करत असताना त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. त्याला गंभीर अवस्थेत रु ग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. कंत्राटदार मनोज आसाराम सूर्यवंशी यांनी धोक्याच्या ठिकाणी मजुरांना कामाला लावले. मात्र, सुरक्षेसंबंधीचे पुरेसे उपाय केले नाही. त्यामुळे प्रतिकच्या मृत्यूला कंत्राटदार मनोज सूर्यवंशी हाच कारणीभूत आहे, असा चौकशी अहवाल पोलिसांनी तयार केला आणि त्याच्याविरु द्ध कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.