शेतीला शाश्वत सिंचनाचा लाभ होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 02:22 AM2017-08-19T02:22:17+5:302017-08-19T02:22:51+5:30

टंचाईमुक्त राज्याची संकल्पना साकारताना पावसाचे पाणी ठिकठिकाणी अडविणे आवश्यक आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात केली जात आहेत.

 Farming will benefit from sustainable irrigation | शेतीला शाश्वत सिंचनाचा लाभ होणार

शेतीला शाश्वत सिंचनाचा लाभ होणार

Next
ठळक मुद्देराम शिंदे : आंजनगाव शिवारात जलपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : टंचाईमुक्त राज्याची संकल्पना साकारताना पावसाचे पाणी ठिकठिकाणी अडविणे आवश्यक आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात केली जात आहेत. या पाण्याचा शेतकºयांना शाश्वत सिंचनासाठी वापर करता येईल. ग्रामीण भागात समृद्धी आणण्यासाठी जनतेने जलयुक्त शिवार अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.
हिंगणा तालुक्यातील आंजनगाव शिवारातील सिमेंट नाला बंधाºयाचे नुकतेच खोलीकरण करण्यात आले. या जलसाठ्याचे प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते विधीवत जलपूजन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. समीर मेघे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य रत्नमाला इरपाते, सुधाकर ढोणे, बबलू गौतम, उपसरपंच अर्चना मरसकोल्हे, विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता बानू बाकडे, उपसभापती अवचट उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानात हिंगणा तालुक्यातील ५८ गावांची निवड केली असून, नाला खोलीकरण, सिमेंट बंधारे, तलाव बांधकाम व खोलीकरणाची कामे करण्यात आली. त्यामुळे जलसाठे निर्माण झाले असून, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होत आहे. मात्र, शेतकºयांनी योग्य नियोजन करून पाण्याचा सिंचनासाठी वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. वेणा नदीच्या खोलीकरणासाठी १८ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून, यावर्षी दोन कोटी रुपये मंजूर केले आहे. नदी पुनरुज्जीवनासाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही प्रा. राम शिंदे यांनी दिली. आ. समीर मेघे म्हणाले, आंजनगाव शिवारातील बंधाºयाची गाळामुळे पाणी साठवण क्षमता संपुष्टात आली होती. नाला खोलीकरण व गाळ काढण्यात आल्याने या बंधाºयात ११.७२ टीसीएम पाणी उपलब्ध झाले आहेत. शिवाय, विहिरींची पाणी पातळी वाढली आहे, असे सांगत वेणा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी १८ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आ. मेघे यांनी केली.

Web Title:  Farming will benefit from sustainable irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.