शेतकऱ्यांनी संत्र्याच्या आधुनिकतेकडे वळावे : के.बी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 11:27 PM2019-01-20T23:27:37+5:302019-01-20T23:28:33+5:30

नागपुरी संत्र्यात देशविदेशात क्रांती करण्याची क्षमता आहे. प्रोसेसिंग फूड आणि फ्रेश फूडला विदेशात जास्त मागणी आहे. ग्राहकांना हवे ते शेतकऱ्यांनी पिकविले पाहिजे. जास्त आणि दर्जेदार उत्पादकतेसाठी शेतकऱ्यांनी नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळावे, असे आवाहन जैन इरिगेशनचे शास्त्रज्ञ व उपाध्यक्ष डॉ. के.बी. पाटील यांनी केले. रेशीमबाग येथील वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये आयोजित चर्चासत्रात संत्र्याचे प्रोसेसिंग आणि निर्यातीची सध्याची स्थिती, या विषयावर त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Farmers should turn to modern orange production: KB Patil | शेतकऱ्यांनी संत्र्याच्या आधुनिकतेकडे वळावे : के.बी. पाटील

शेतकऱ्यांनी संत्र्याच्या आधुनिकतेकडे वळावे : के.बी. पाटील

Next
ठळक मुद्देवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : संत्र्याचे प्रोसेसिंग व निर्यातीच्या स्थितीवर चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरी संत्र्यात देशविदेशात क्रांती करण्याची क्षमता आहे. प्रोसेसिंग फूड आणि फ्रेश फूडला विदेशात जास्त मागणी आहे. ग्राहकांना हवे ते शेतकऱ्यांनी पिकविले पाहिजे. जास्त आणि दर्जेदार उत्पादकतेसाठी शेतकऱ्यांनी नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळावे, असे आवाहन जैन इरिगेशनचे शास्त्रज्ञ व उपाध्यक्ष डॉ. के.बी. पाटील यांनी केले.
रेशीमबाग येथील वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये आयोजित चर्चासत्रात संत्र्याचे प्रोसेसिंग आणि निर्यातीची सध्याची स्थिती, या विषयावर त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना शेतीमध्ये परिवर्तन करण्याची गरज आहे. गेल्या २५ वर्षांत डाळिंब, केळी आणि द्राक्षाच्या उत्पादनात जसे परिवर्तन झाले तसे संत्र्याच्या बाबतीत घडले नाही. उत्पादन तंत्रज्ञानात बदल घडविणे, पाण्याची बचत करणे शिकले पाहिजे. जेवढे जास्त पाणी तेवढीच बागायत खराब होते, असे अमेरिकन कृषितज्ज्ञांनी म्हटले आहे. काळाच्या गरजेनुसार शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानात बदल करून उत्पादन जास्त प्रमाणात घेतले पाहिजे. केळीचे निर्जलीकरण करून जळगाव येथे केळीच्या उत्पादनात वाढ झाली आहे. चीन फळांच्या निर्यातीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. संत्रा उत्पादनात ब्राझील आणि फ्लोरिडा जगात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यात रसाचे प्रमाण जास्त आहे. जागतिक स्तरावर भारताची बलाढ्या कंपन्याशी स्पर्धा आहे. शेतकऱ्यांना १०० टक्के ठिबक सिंचनावर जावे लागेल. त्यामुळे आणि त्याला जोड म्हणून आधुनिक तंत्रज्ञान, दर्जा आणि सर्वाधिक उत्पादकतेने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे. मोर्शीतील प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
संत्र्याचे क्षेत्र वाढले पण उत्पादकता कमी : डॉ. निशांत देशमुख
गेल्या १२ वर्षांत देशाच्या पूर्वोत्तर भागात संत्र्याचे क्षेत्र वाढले पण उत्पादन दर्जेदार नसल्याचे मत आयसीएआरचे मेघालय येथील शास्त्रज्ञ डॉ. निशांत देशमुख यांनी नार्थ-ईस्ट इंडियातील सायट्रसची स्थिती, या विषयावर बोलताना व्यक्त केले. २००५ ते २०१७ या दरम्यान संत्र्याचे क्षेत्र दुप्पट झाले आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि मेघालय येथे काही जातीच्या संत्र्याचे उत्पादन वाढले आहे. या ठिकाणाहून बांगलादेशात संत्रा जातो. तेथून विदेशात जाते. खासी मॅन्डरिन आणि ताशी प्रजातीची संत्रे दर्जेदार आहे. आसाममध्ये चांगल्या प्रतिच्या लिंबूचे उत्पादन होते. शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्यावर मार्गदर्शन करण्यात येते. निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्यात येते.
बडिंगने संत्र्याच्या शेतीला प्रारंभ : पासंग तमांग
सिक्कीममध्ये पारंपरिक पद्धतीने संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. विशेष योजनेत १५ वर्षे जुन्या संत्र्याच्या झाडांना आधुनिक पद्धतीने नवजीवन देण्यात येत आहे. रोपे तयार करून शेतकऱ्यांना वितरण करण्यात येते. बडिंगने संत्र्याची शेती करणे सुरू केल्याने उत्पादकता वाढल्याचे मत सिक्कीमच्या फलोत्पादन विभागाचे उपसंचालक पासंग तमांग यांनी ‘ऑरेंज कल्टिव्हेशन इन सिक्कीम’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात व्यक्त केले. संत्र्याचे उत्पादन सिक्कीमच्या दऱ्यांमध्ये घेतले जाते. तिथे तापमान कमी असते. संत्र्याच्या व्यावसायिक उत्पादनासाठी २६ ते ३२ डिग्री तापमान उत्तम आहे. चहा, चेरी पेपर, केळी, संत्र्याचे उत्पादन घेण्यात येते. संत्र्याचे उत्पादन ८,६०० हेक्टरवर असून, गेल्या वर्षी १५,७५० टन उत्पादन झाले. प्रति हेक्टर उत्पादन फारच कमी आहे. संत्र्याच्या दोन झाडांमध्ये मटरचे उत्पादन आणि आधुनिक तंत्रज्ञानावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते.
संत्रा उत्पादन वाढीवर भर : आर. कार्तिक
आंध्र प्रदेशात १८ हजार हेक्टर जमीन संत्र्याच्या लागवडीखाली आहे. कोस्टल जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. सातगुडी व्हेरायटी चांगली आहे. १३ जिल्ह्यांमध्ये स्वीट ऑरेंजचे उत्पादन होत असून, प्रति हेक्टर उत्पादन १० ते १५ टन एवढे आहे. संत्रा उत्पादनात वाढ आणि निर्यातीवर सरकारतर्फे भर देण्यात असल्याचे मत आंध्र प्रदेशच्या फलोत्पादन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आर. कार्तिक यांनी चर्चासत्रात व्यक्त केले. उत्पादन वाढीसाठी ठिबक पद्धतीवर भर आहे. एससी, एसटी शेतकऱ्यांना १०० टक्के सबसिडी देण्यात येते. याशिवाय सबसिडीच्या अनेक योजना आहेत. लिंबू आणि स्वीट ऑरेंजच्या निर्यातीवर भर देण्यासाठी शेतकºयांना प्रशिक्षण आणि सहकार्य करण्यात येते.

Web Title: Farmers should turn to modern orange production: KB Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.