कौटुंबिक कलह वाढताहेत, नागपुरात वर्षाला सव्वातीन हजार तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 02:23 PM2018-05-11T14:23:07+5:302018-05-11T14:23:19+5:30

जगामध्ये भारतीय विवाह संस्था सर्वात बळकट मानली जाते, पण येणारा काळ ही ओळख पुसून टाकेल, अशी परिस्थिती तयार होत आहे. कुटुंब न्यायालयात दरवर्षी दाखल होणाऱ्या प्रकरणांची आकडेवारी भारतीय विवाह संस्थेचे आरोग्य बिघडल्याचे स्पष्ट करीत आहे. एकट्या नागपूर कुटुंब न्यायालयाचे उदाहरण घेतल्यास, येथे दरवर्षी कौटुंबिक कलहाच्या सरासरी सव्वातीन हजारावर तक्रारी (प्रकरणे) दाखल होत आहेत.

Family discontinuity, Nagpur has received about three and a half thousand complaints per year | कौटुंबिक कलह वाढताहेत, नागपुरात वर्षाला सव्वातीन हजार तक्रारी

कौटुंबिक कलह वाढताहेत, नागपुरात वर्षाला सव्वातीन हजार तक्रारी

Next
ठळक मुद्देविवाह संस्थेचे आरोग्य बिघडलेदाम्पत्यांमधील हेवेदावे कारणीभूतदहा वर्षात ३३ हजार ५६६ प्रकरणे दाखल

राकेश घानोडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगामध्ये भारतीय विवाह संस्था सर्वात बळकट मानली जाते, पण येणारा काळ ही ओळख पुसून टाकेल, अशी परिस्थिती तयार होत आहे. कुटुंब न्यायालयात दरवर्षी दाखल होणाऱ्या प्रकरणांची आकडेवारी भारतीय विवाह संस्थेचे आरोग्य बिघडल्याचे स्पष्ट करीत आहे. एकट्या नागपूर कुटुंब न्यायालयाचे उदाहरण घेतल्यास, येथे दरवर्षी कौटुंबिक कलहाच्या सरासरी सव्वातीन हजारावर तक्रारी (प्रकरणे) दाखल होत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर कुटुंब न्यायालयात २००८ ते २०१७ या १० वर्षांत एकूण ३३ हजार ५६६ (दरवर्षी सरासरी ३,३५६) प्रकरणे दाखल झाली होती. यावर्षी मार्चपर्यंत १०५२ प्रकरणे दाखल झाली. ती संख्या आता निश्चितच वाढली आहे. त्यावरून विवाह संस्थेला तडे जात असल्याचे सिद्ध होते.
ही आहेत कारणे
यामागे विविध कारणे असून त्यासंदर्भात नागपूर कुटुंब न्यायालय विधिज्ञ संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. श्याम अंभोरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वकिली व्यवसायातील अनुभवावरून अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. स्वत:बद्दचा अहंकार, एकमेकांना कमी लेखणे, जोडीदाराने आपल्या मनासारखे वागावे असा आग्रह धरणे, एकमेकांच्या कामात हस्तक्षेप, सहनशीलतेचा अभाव, विभक्त कुटुंब पद्धती, एकमेकांना पुरेसा वेळ देण्यास टाळाटाळ, विवाहबाह्य संबंध, शारीरिक व मानसिक छळ, एकमेकांच्या नातेवाईकांचा अनादर करणे इत्यादी अनेक कारणांमुळे विवाह संस्थेला तडे जात असल्याचे त्यांनी सांगितले.
भांडणामुळे एका छताखाली राहणे अशक्य झाल्यानंतर पती-पत्नी, घटस्फोट, पोटगी, अपत्यांचा ताबा, राहायला घर मिळणे, स्त्रीधन परत मिळणे, मालमत्ता विक्रीवर मनाईहुकूम मिळविणे यासह अन्य विविध वैवाहिक अधिकार मिळविण्यासाठी कुटुंब न्यायालयात धाव घेतात.
पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे पती-पत्नीमधील वाद, संबंध कायमचे तोडण्यापर्यंतच्या विकोपाला जात नव्हता. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी मध्यस्थी करून भांडणाऱ्या  पती-पत्नीमध्ये मेळ घडवून आणत होते. आज तशी परिस्थिती नाही. त्यामुळे पती-पत्नी एकमेकांना समजून घेण्यात कमी पडल्यास त्याचा थेट परिणाम विवाहावर होतो व त्यांचे वैवाहिक संबंध कायमचे संपुष्टात येतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

वर्ष    प्रकरण संख्या
२००८    २५२४
२००९    ३६२९
२०१०    २५६०
२०११    २६७४
२०१२    ३३००
२०१३    ३६८२
२०१४    ३८८१
२०१५    ३६५५
२०१६    ३७९८
२०१७    ३८६३
 
  
  

 

Web Title: Family discontinuity, Nagpur has received about three and a half thousand complaints per year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.