'अर्थ अवर'मधून दिला ऊर्जा बचतीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:45 AM2018-03-25T00:45:58+5:302018-03-25T00:46:11+5:30

ऊर्जा बचतीचा संदेश देण्यासाठी महापालिका आणि ग्रीन विजील फाऊंडेशनच्या पुढाकारातून 'अर्थ अवर-कनेक्ट टू अर्थ' पाळण्यात आला. महापालिकेच्या आवाहनाला दाद देत नागपूरकरांनी शनिवारी रात्री ८.३० ते ९.३० या एक तासाच्या काळात अनावश्यक वीज दिवे बंद ठेवून करून ऊर्जाबचतीचा संदेश दिला.

Energy saving energy from 'Earth's inferior' message | 'अर्थ अवर'मधून दिला ऊर्जा बचतीचा संदेश

'अर्थ अवर'मधून दिला ऊर्जा बचतीचा संदेश

Next
ठळक मुद्देमनपा-ग्रीन विजीलचा पुढाकार : एकतास दिवे बंद ठेवले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऊर्जा बचतीचा संदेश देण्यासाठी महापालिका आणि ग्रीन विजील फाऊंडेशनच्या पुढाकारातून 'अर्थ अवर-कनेक्ट टू अर्थ' पाळण्यात आला. महापालिकेच्या आवाहनाला दाद देत नागपूरकरांनी शनिवारी रात्री ८.३० ते ९.३० या एक तासाच्या काळात अनावश्यक वीज दिवे बंद ठेवून करून ऊर्जाबचतीचा संदेश दिला.
या निमित्त सीताबर्डी येथील इटर्निटी मॉल येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर नंदा जिचकार, आमदार प्रा. अनिल सोले,धरमपेठ झोन सभापती रूपा राय, माजी महापौर प्रवीण दटके, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, महापालिकेतील उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेवक सुनील हिरणवार, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, ग्रीन विजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चटर्जी, इटर्निटी मॉलचे महाव्यवस्थापक आशिष बारई उपस्थित होते.
ग्रीन विजीलचे मधुसूदन चटर्जी, सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, शीतल चौधरी, विष्णुदेव यादव, विकास यादव, अमोल भलमे, कार्तिकी कावळे, अमित पालिया, यश केडिया, रोशनी बाघेर, निशित जयपुरिया आदीनी मॉल मधील व्यापाऱ्याना 'अर्थ अवर'बाबत माहिती दिली. ऊर्जा बचत, प्लास्टिक बहिष्कार, पाणी बचत, अन्नाची नासाडी, कागदाचा कमीत कमी उपयोग याविषयी जनजागृती केली.
अर्थ अवरची प्रेरणा घेऊन नागपुरात 'पौर्णिमा दिवस' साजरा करण्यात येतो. या दिवशीही रात्री एक तास विजेची उपकरणे बंद ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. आतापर्यंत या माध्यमातून १ लाख २५ हजार किलो कार्बन उत्सर्जन थांबविण्यात यश आले आहे.

Web Title: Energy saving energy from 'Earth's inferior' message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.