मातृत्वाचे स्वागत करताना आहाराइतकीच भावनिक आंदोलनेही महत्त्वाची मानली जावी - डॉ. प्रभा चंद्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 07:52 PM2018-01-27T19:52:56+5:302018-01-27T19:56:51+5:30

गरोदर स्त्रीच्या मनोआरोग्याचेही महत्त्व जाणण्याची गरज बंगळुरु येथील निम्हान्समधील (नॅशनल इन्स्टीट्यूट आॅफ मेंटल हेल्थ अ‍ॅन्ड न्यूरो सायन्सेस) आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मानसशास्त्रज्ञ डॉ. प्रभा चंद्रा यांनी येथे व्यक्त केली.

Emotional health of a pregnant woman is equally important as her food - Dr. Prabha Chandra | मातृत्वाचे स्वागत करताना आहाराइतकीच भावनिक आंदोलनेही महत्त्वाची मानली जावी - डॉ. प्रभा चंद्रा

मातृत्वाचे स्वागत करताना आहाराइतकीच भावनिक आंदोलनेही महत्त्वाची मानली जावी - डॉ. प्रभा चंद्रा

googlenewsNext
ठळक मुद्देअन्य देशांमध्ये आहार व मानसिक आरोग्याचा साकल्याने होतो विचारआपण प्रत्युत्तरवादी झालो आहोत

वर्षा बाशू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: गरोदर स्त्रीच्या आहाराबाबत आपला देश थोडाफार सजग झाला असला तरी तिच्या मानसिक आरोग्याबाबत मात्र आपण इतर देशांच्या तुलनेत अजूनही फार मागे आहोत असे प्रतिपादन करतानाच तिच्या मनोआरोग्याचेही महत्त्व जाणण्याची गरज बंगळुरु येथील निम्हान्समधील (नॅशनल इन्स्टीट्यूट आॅफ मेंटल हेल्थ अ‍ॅन्ड न्यूरो सायन्सेस) आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मानसशास्त्रज्ञ डॉ. प्रभा चंद्रा यांनी येथे व्यक्त केली. नागपुरात भारतीय स्त्री शक्तीच्या त्रिदशकपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी त्या येथे आल्या होत्या.
गरोदर स्त्रिया जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा आपण त्यांना, तुम्ही इथे कशा पोहचलात असा प्रश्न विचारतो. त्यावरची त्यांची उत्तरे फार अंतर्मुख करणारी असतात. आजही आपल्या देशात स्त्रियांना प्रेग्नन्सी ही नियोजनपूर्वकरित्या आखता येत नाही. ती त्यांच्यावर लादली जाते किंवा ती अपघाताने त्यांच्या आयुष्यात येते. त्या मानसिकदृष्ट्या मातृत्वासाठी तयारच नसतात. अशात प्रेग्नन्सीमुळे होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे होणारी भावनिक आंदोलने सांभाळण्याचे कसब त्यांच्यात तर नसतेच पण त्यांच्या कुटुंबियांनाही त्याचे महत्त्व वाटत नसते.
अनेक देशांमध्ये तेथील गरोदर स्त्रियांच्या आहारासोबत त्यांच्या आनंदी राहण्याबाबतही तेथील वैद्यक क्षेत्र व सरकार सजग असते. त्यादृष्टीने तेथे आहार व विहार सुचविला जातो. आपल्याकडे या सगळ््याच बाबीची उणीव आहे.
अलीकडची पिढी ही प्रत्युत्तरवादी (रिअ‍ॅक्टिव्ह) झाली आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या हाती सदैव असलेला मोबाईल होय. कुठल्याही स्टेटसला तात्काळ उत्तर देण्याची जी सवय मनाला जडली आहे त्यामुळे आपण आपल्या आत्मप्रतिबिंबापासून फार दूर चाललो आहोत. सगळं काही बाहेरून आपल्यात कोसळत आहे. मात्र आपल्यातलं आतलं पाहणं आपण विसरत चाललो आहोत.
कृतज्ञता हा मानवाचा फार मोठा गुण असून तोच आपण विसरत चाललो आहोत. आभार मानणे वा आभारी असणे हे शिकवले जात नाही. कोरड्या थँक्स पुरेसे नाहीत. ते मनापासून जाणवलं पाहिजे. तरंच माणसामाणसातले संबंध अधिक बळकट होतील. जगात सर्वत्र तणावाचे वातावरण वाढते आहे. त्याकरिता सकारात्मक मानसिकता वाढवणे व जपण्याची चळवळ सर्वत्र सुरू व्हायला हवी, अशी गरज त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Emotional health of a pregnant woman is equally important as her food - Dr. Prabha Chandra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.