विदर्भातील सात खासदारांच्या निवडणुकीला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 08:07 PM2019-07-08T20:07:49+5:302019-07-08T20:09:54+5:30

लोकसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत विदर्भातील सात खासदारांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या खासदारांमध्ये भारतीय जनता पार्टीचे नितीन गडकरी, अशोक नेते, सुनील मेंढे, रामदास तडस, शिवसेनेचे कृपाल तुमाने, प्रतापराव जाधव व काँग्रेसचे बाळू धानोरकर यांचा समावेश आहे.

Election of Seven MPs of Vidarbha challenged | विदर्भातील सात खासदारांच्या निवडणुकीला आव्हान

विदर्भातील सात खासदारांच्या निवडणुकीला आव्हान

Next
ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : दोषपूर्ण ईव्हीएम वापरल्याचा दावा

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : लोकसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत विदर्भातील सात खासदारांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या खासदारांमध्ये भारतीय जनता पार्टीचे नितीन गडकरी, अशोक नेते, सुनील मेंढे, रामदास तडस, शिवसेनेचे कृपाल तुमाने, प्रतापराव जाधव व काँग्रेसचे बाळू धानोरकर यांचा समावेश आहे.
गडकरी नागपूर, तुमाने रामटेक, नेते गडचिरोली-चिमूर, मेंढे भंडारा-गोंदिया, जाधव बुलडाणा, धानोरकर चंद्रपूर तर तडस वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. गडकरी यांच्याविरुद्ध काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले, वंचित बहुजन आघाडीचे मनोहर डबरासे यांच्यासह एकूण तिघांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे. काँग्रेसचे पराभूत उमेदवार किशोर गजभिये यांनी तुमाने यांच्या निवडणुकीला तर, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेशकुमार गजबे, कारू नान्हे, बळीराम सिरसकर, अ‍ॅड. राजेंद्र महाडोले व धनराज वंजारी यांनी इतर खासदारांच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. निवडणुकीत दोषपूर्ण ईव्हीएम वापरण्यात आल्या. त्यामुळे झालेले मतदान व मोजण्यात आलेले मतदान यात फरक आढळून आला. त्याचा फायदा विजयी उमेदवारांना मिळाला. तसेच, निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक कायद्यातील तरतुदी व नियमांचे काटेकोर पालन केले नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Election of Seven MPs of Vidarbha challenged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.