आठ महिन्यात सिलिंडरची २९३ रुपये दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 11:45 PM2018-11-10T23:45:54+5:302018-11-10T23:47:35+5:30

आंतरराष्ट्रीय स्तराचा आढावा घेऊन दर महिन्यात देशांतर्गत गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होत असते. नोव्हेंबरमध्ये विनाअनुदानित सिलिंडरची किंमत तब्बल ६२ रुपयांनी वाढविली आहे. घरगुती वापराचा अनुदानित सिलिंडर ५१४.५८ रुपयांना मिळत असला तरीही ग्राहकांना सिलिंडर खरेदी करताना ९९३ रुपये मोजावे लागत आहे. महागाईने नागरिक आधीच त्रस्त असताना त्यात सिलिंडरच्या दरवाढीने भर पडत आहे. आठ महिन्यात सिलिंंडरची किंमत २९३ रुपयांनी वाढली आहे.

In eight months, the hike of Rs 293 per cylinders | आठ महिन्यात सिलिंडरची २९३ रुपये दरवाढ

आठ महिन्यात सिलिंडरची २९३ रुपये दरवाढ

googlenewsNext
ठळक मुद्देअनुदानित सिलिंडर ४.९४ रुपयांनी वाढले : विनाअनुदानित सिलिंडर ९९३ रुपये

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय स्तराचा आढावा घेऊन दर महिन्यात देशांतर्गत गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होत असते. नोव्हेंबरमध्ये विनाअनुदानित सिलिंडरची किंमत तब्बल ६२ रुपयांनी वाढविली आहे. घरगुती वापराचा अनुदानित सिलिंडर ५१४.५८ रुपयांना मिळत असला तरीही ग्राहकांना सिलिंडर खरेदी करताना ९९३ रुपये मोजावे लागत आहे. महागाईने नागरिक आधीच त्रस्त असताना त्यात सिलिंडरच्या दरवाढीने भर पडत आहे. आठ महिन्यात सिलिंंडरची किंमत २९३ रुपयांनी वाढली आहे.

डीलरचे कमिशन ग्राहकांकडून
घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत केंद्राने नोव्हेंबरमध्ये दोनदा वाढ केली. १ नोव्हेबरला किंमत २.९४ रुपयांनी वाढविली तर २ नोव्हेंबरला डीलर्सचे कमिशन पुन्हा २ रुपयांनी वाढवून त्याचा भार ग्राहकांवर टाकला आहे. त्यामुळे नागपुरात अनुदानित सिलिंडर ५१४.५८ रुपयांना मिळत आहे. सिलिंडर डीलर्सचे कमिशन २०१७ नंतर वाढविण्यात आले नव्हते. सिलिंडरच्या ने-आण करण्याच्या खर्चात झालेली वाढ, वाढते पगार ही मागणी लक्षात घेता कमिशन वाढविण्यात आल्याची माहिती डीलर्सने दिली. त्यामुळे १४.२ किलो वजनाच्या सिलिंडरमागे ५०.५८ रुपये आणि पाच किलो वजनाच्या सिलिंडरमागे २५.२९ रुपये कमिशन मिळत आहे.

आठ  महिन्यात २३१ रुपयांनी महागले
यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत विना सबसिडी घरगुती गॅसच्या किमतीत तब्बल २९३ रुपयांची वाढ झाली आहे. सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा हवाला देत सिलिंडरची किंमत वाढविल्यास डिसेंबरमध्ये ११०० रुपयांचा आकडा पार करण्याची दाट शक्यता आहे.

सरकारने दरवाढीवर नियंत्रण आणावे
गॅसची दरवाढ आंतरराष्ट्रीय बाजारानुसार देशांतर्गत होत असते. ही बाब खरी आहे. पण दरवाढीमुळे ग्राहक नक्कीच त्रस्त झाला आहे. सिलिंडरची सबसिडी बँक खात्यात जमा होण्यास विलंब होत असल्यामुळे ग्राहकाला महिन्याच्या प्रारंभी गॅस सिलिंडर खरेदीसाठी जास्त आर्थिक तरतूद करावी लागत आहे. वाढत्या महागाईत ही तरतूद गरीब आणि सामान्यांना अशक्य आहे. पेट्रोल, डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश आणि घरगुती गॅसच्या किमती नियंत्रणात आणाव्यात, अशी मागणी अ.भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री गजानन पांडे यांनी लोकमतशी बोलताना केली.

अशी  वाढली किंमत
एप्रिल ७०० रु.
मे ६९९ रु.
जून ७४८ रु.
जुलै ८०६.५० रु.
आॅगस्ट ८४२ रु.
सप्टेंबर ८७२ रु.
आॅक्टोबर ९३१ रु.
नोव्हेंबर ९९३ रु.

Web Title: In eight months, the hike of Rs 293 per cylinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.