काठिण्य पातळी तपासण्यासाठी शिक्षण तज्ज्ञांची समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 10:58 PM2018-07-09T22:58:28+5:302018-07-09T22:59:56+5:30

इयत्ता ११ वी व १२ वीचा अभ्यासक्रम देशपातळीवर समान असावा, या धोरणानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ( एचएससी) तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) यांचा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. या दोन्ही माध्यमांच्या शाळांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी दोन्ही माध्यमांच्या मंडळांमध्ये स्वतंत्रपणे भेदभाव केला जाणार नाही. परंतु दोन्ही माध्यमांच्या अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी तपासणीच्या दृष्टीने शिक्षणतज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल. दिवाळीच्या आधी ही समिती यासंदर्भात विचार करेल तेव्हा आपला अहवाल सादर करू शकता. अहवालामधील शिफारशीनंतर योग्य पर्यायाची शिक्षणतज्ज्ञांसोबत चर्चा करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली.

The Education Expert Committee to check the level of strictness | काठिण्य पातळी तपासण्यासाठी शिक्षण तज्ज्ञांची समिती

काठिण्य पातळी तपासण्यासाठी शिक्षण तज्ज्ञांची समिती

googlenewsNext
ठळक मुद्दे शिक्षणमंत्री विनोद तावडे


 विनोद तावडे
नागपूर : इयत्ता ११ वी व १२ वीचा अभ्यासक्रम देशपातळीवर समान असावा, या धोरणानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ( एचएससी) तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) यांचा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. या दोन्ही माध्यमांच्या शाळांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी दोन्ही माध्यमांच्या मंडळांमध्ये स्वतंत्रपणे भेदभाव केला जाणार नाही. परंतु दोन्ही माध्यमांच्या अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी तपासणीच्या दृष्टीने शिक्षणतज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल. दिवाळीच्या आधी ही समिती यासंदर्भात विचार करेल तेव्हा आपला अहवाल सादर करू शकता. अहवालामधील शिफारशीनंतर योग्य पर्यायाची शिक्षणतज्ज्ञांसोबत चर्चा करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली.
शिक्षणमंत्री तावडे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये एचएससी बोर्डाबरोबरच सीबीएसई, आयसीएसई, आयबी या अभ्यासक्रमाचेही मंडळ आहे. या मंडळामध्ये महाराष्ट्राचे विद्यार्थी शिक्षण घेतात. या दोन्ही मंडळाच्या काठिण्य पातळीमध्ये फारशी तफावत नाही. सीबीएसई आदी मंडळाच्या विद्यार्थ्यांना ५०० तर एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ६५० गुण असतात. तरीही दोन्ही मंडळाच्या काठिण्य पातळीची समानता तपासण्याच्यादृष्टीने शिक्षणतज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल. समितीच्या अहवालावर घेण्यात येणारा निर्णय हा गुणवत्तेच्या आधारावर घेण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. सुनील प्रभू, अबू आझमी, राज पुरोहित या सदस्यांनी विधानसभेत लक्षवेधीमांडली होती.

‘नेबरहूड स्कूलिंग’ संकल्पना शासनाच्या विचाराधीन
अकरावीच्या आॅनलाईन प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या घराजवळ प्रवेश न मिळता तो अतिशय दूर मिळतो, त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते, तरीही विद्यार्थ्यांना अकरावीचे प्रवेश देताना हे प्रवेश विद्यार्थ्यांच्या घराच्या जवळ मिळावेत, अशी मागणी राज पुरोहित यांनी केली असता, तावडे म्हणाले की, ‘नेबरहूड स्कूलिंग’ ही संकल्पना राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. त्यादृष्टीने यासंदर्भात अभ्यास करण्याच्यादृष्टीने एक समिती स्थापन करण्यात येईल. शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव,शालेय शिक्षण, प्रधान सचिव, विधी व न्याय विभागाचे शिक्षण आयुक्त त्याचप्रमाणे सदनाचे सदस्य यांची एक समिती स्थापन करण्यात येईल. यासमितीने दिलेल्या अहवालानंतर यासंदर्भात विचार करण्यात येईल,असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

Web Title: The Education Expert Committee to check the level of strictness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.