दारूची तस्करी करताना एसी कोच अटेंडंटला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:19 AM2019-06-22T00:19:00+5:302019-06-22T00:20:32+5:30

गोरखपुर एक्स्प्रेसमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या बी ३ कोचच्या एसी अटेंडंटला रंगेहात अटक करून त्याच्याकडून २३६८ रुपये किमतीच्या दारूच्या ३२ बॉटल जप्त करण्यात आल्या.

During the smuggling of alcohol, the AC coach attendant was arrested | दारूची तस्करी करताना एसी कोच अटेंडंटला अटक

दारूची तस्करी करताना एसी कोच अटेंडंटला अटक

googlenewsNext
ठळक मुद्देगोरखपूर एक्स्प्रेसमधील घटना : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सोपविले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरखपुर एक्स्प्रेसमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या बी ३ कोचच्या एसी अटेंडंटला रंगेहात अटक करून त्याच्याकडून २३६८ रुपये किमतीच्या दारूच्या ३२ बॉटल जप्त करण्यात आल्या.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गठित केलेल्या टीम बीचे सदस्य सहायक उपनिरीक्षक राजेश काळे, प्रधान आरक्षक श्रवण पवार, एस. के. पाण्डेय, अनिस खान, नितेश ठमके, मुनेश कुमार गौतम हे रेल्वेगाडी क्रमांक १५०१६ गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये कर्तव्य बजावत होते. त्यांना बल्लारशाह ते नागपूर दरम्यान रात्री ९.३० वाजता ए-१ कोचमध्ये एक व्यक्ती बॅगसोबत संशयास्पद स्थितीत आढळला. चौकशीत त्याने आपले नाव शुभम सुरेश मद्देसाई (२२) रा. बोदवार, कुशीनगर, उत्तर प्रदेश सांगितले. बॅगमध्ये काय आहे, अशी विचारणा केली असता त्यात दारूच्या बॉटल असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्यास मुद्देमालासह नागपूर रेल्वेस्थानकावर उतरवून सहायक उपनिरीक्षक एस. बी. कांबिलकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्याच्या जवळील बॅगमध्ये कर्नाटक येथे तयार केल्या दारूच्या ३२ बॉटल आढळल्या. निरीक्षक रवी जेम्स यांच्या आदेशानुसार आरोपीला मुद्देमालासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.

Web Title: During the smuggling of alcohol, the AC coach attendant was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.