वेळेवर उपचार न झाल्यामुळे नागपुरात रेल्वे प्रवाशाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:45 PM2019-06-19T23:45:36+5:302019-06-19T23:46:20+5:30

रेल्वेच्या बेजबाबदारपणामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना नागपुरात घडली.

Due to non-medical treatment in time, the death of the train passenger in Nagpur | वेळेवर उपचार न झाल्यामुळे नागपुरात रेल्वे प्रवाशाचा मृत्यू

वेळेवर उपचार न झाल्यामुळे नागपुरात रेल्वे प्रवाशाचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देहेल्पलाईनवर मिळाली नाही मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेच्या बेजबाबदारपणामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना नागपुरात घडली. शरद जायसवाल (३५) असे मृत प्रवाशाचे नाव आहे.
जायसवाल हे काही दिवसांपुर्वी प्रयागराज येथे आपल्या घरी गेले होते. तेथून ते मंगळवारी गंगाकावेरी एक्स्प्रेसने नागपुरात येत होते. एसी थ्री टायरमध्ये बी-१ कोचमध्ये प्रवास करीत असताना जबलपूरजवळ त्यांची प्रकृती खराब झाली. त्यांनी हेल्पलाईनवर मदतीसाठी संपर्क साधला. याशिवाय गाडीतील टीटीई आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना सांगितले. परंतु कुणीच त्यांची दखल घेतली नाही. यामुळे इटारसीत त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाही. दरम्यान त्यांची तब्येत आणखी खराब झाल्याची माहिती नागपुरातील त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांना एका प्रवाशाने दिली. ही गाडी रात्री १० वाजता नागपुरात पोहोचली असता जायसवाल काहीच हालचाल करीत नव्हते. त्यांचे मित्र त्वरित त्यांना खासगी रुग्णालयात घेऊन गेले. येथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. जायसवाल यांच्यावर इटारसी रेल्वेस्थानकावर उपचार केले असते तर त्यांचा जीव वाचला असता. परंतु रेल्वे हेल्पलाईन आणि संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे नातेवाईक कमलकांत यांनी केला आहे. याबाबत तक्रार घेण्यासही रेल्वे प्रशासनाने टाळाटाळ केली.
सूचना मिळाल्यानंतर केली होती तपासणी
‘जायसवाल यांची तब्येत खराब झाल्याची सूचना मिळाल्यानंतर इतर गाड्यांना सेक्शनमध्ये थांबवून गंगाकावेरी एक्स्प्रेसला सिग्नलवर न थांबविता थेट नागपुरात आणण्यात आले. ही गाडी नागपूरला पोहोचल्यानंतर रेल्वे डॉक्टरांनी जायसवाल यांची तपासणी केली होती. नागपुर विभागात आजपर्यंत सर्व डॉक्टर पाहण्यात येतात. घडलेली घटना दुर्दैवी आहे.’
-एस. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

Web Title: Due to non-medical treatment in time, the death of the train passenger in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.