नागपुरातील विवाहितेच्या अवयवदानाने पाच जणांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:06 AM2019-06-14T00:06:00+5:302019-06-14T00:10:01+5:30

मेंदूत रक्तस्राव होऊन ब्रेनडेड झालेल्या पत्नीच्या दु:खातही मानवतावादी भूमिका घेत अवयवदानाचा निर्णय घेत समाजापुढे आदर्श ठेवला. यामुळे पाचजणांना जीवनदान मिळाले. नीलिमा लक्ष्मण राऊत (४०) रा. महाल नागपूर त्या अवयवदात्याचे नाव.

Due to Married Woman's organ donation Five people got life in Nagpur | नागपुरातील विवाहितेच्या अवयवदानाने पाच जणांना जीवनदान

नागपुरातील विवाहितेच्या अवयवदानाने पाच जणांना जीवनदान

Next
ठळक मुद्देराऊत कुटुंबीयांचा पुढाकार : मूत्रपिंड, यकृत व नेत्र केले दान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मेंदूत रक्तस्राव होऊन ब्रेनडेड झालेल्या पत्नीच्या दु:खातही मानवतावादी भूमिका घेत अवयवदानाचा निर्णय घेत समाजापुढे आदर्श ठेवला. यामुळे पाचजणांना जीवनदान मिळाले. नीलिमा लक्ष्मण राऊत (४०) रा. महाल नागपूर त्या अवयवदात्याचे नाव.
नीलिमा राऊत या एका औषध कंपनीत दीड वर्षांपासून नोकरी करीत होत्या. त्यांच्या पतीचे लहानसे दुकान आहे. त्या हृदयविकाराने आजारी होत्या. त्यातच त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने १२ जूनला लकडगंजमधील न्यू इरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी उपचारांची शर्थ केली. मात्र, रात्री उशिरा नीलिमा यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. नीलिमा यांच्या मृत्यूने त्यांचे पती लक्ष्मण राऊत, नववीत शिकणारा मुलगा, सहावीत शिकणारी मुलगी तसेच भाऊ शिवशंकर म्हस्के यांना मोठा धक्का बसला. रुग्णालयातील डॉ. नीलेश अग्रवाल यांनी राऊत कुटुंबीयांचे सांत्वन करीत अवयवदानाविषयी समुपदेशन केले. लक्ष्मण राऊत यांनी पत्नीवियोगाचे दु:ख बाजूला ठेवून धीरोदात्तपणे तिच्या यकृत, दोन मूत्रपिंड व दोन डोळे आदी दान करण्यास सहमती दर्शवली.
तेथील डॉक्टरांकडून सूचना मिळताच अवयव प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवि वानखेडे व समन्वयिका वीणा वाठोरे आदींनी पुढील कायदेशीर कार्यवाही केली. प्रतीक्षा यादीनुसार यकृत व एक मूत्रपिंड न्यू इरा रुग्णालय, दुसरे मूत्रप्ािंड वोक्हार्ट रुग्णालयातील रुग्णांस तंतोतंत जुळले. डोळे महात्मे नेत्र पेढीस देण्यात आले.
न्यू इरा रुग्णालयात सुसज्ज प्रत्यारोपण केंद्र असल्याने डॉ. आनंद संचेती, डॉ. निधिश मिश्रा, डॉ. नीलेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना, डॉ. विजेंद्र किरनाके, डॉ. अमोल कोकास, डॉ. साहिल बन्सल, डॉ. सविता जयस्वाल तर नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. शिवनारायण आचार्य, डॉ. रवि देशमुख, डॉ. अमित देशपांडे आदींनी यकृत व मूत्रप्ािंड तेथील प्रतिक्षित रुग्णांत प्रत्यारोपित केले.
वोक्हार्ट रुग्णालयाचे डॉ. संजय कोलते, डॉ. किरण व्यवहारे, समन्वयिका पायल कात्रे आदी पथकाने दुसरे मूत्रपिंड शंकरनगरातील रुग्णालयात नेऊन तेथील प्रतिक्षित रुग्णात प्रत्यारोपित केले.
२० वे यकृत प्रत्यारोपण
न्यू इरा रुग्णालयाने पहिले हृदय प्रत्यारोपण येथेच केले. आतापर्यंत न्यू इरा रुग्णालयात ८ मूत्रपिंड व २० यकृत प्रत्यारोपण झाले आहे. वैद्यकीय सेवेसाठी पर्यायाने अवयव प्रत्यारोपणासाठी डेडिकेटेड डॉक्टर्स व कर्मचारी असल्यानेच हा गौरव प्राप्त झाल्याचे डॉ. आनंद संचेती यांनी सांगितले.

Web Title: Due to Married Woman's organ donation Five people got life in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.