नागपूर विभागात बंदमुळे एसटी महामंडळाला ३० लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क on Wed, January 03, 2018 9:17pm

बंदमुळे एसटी महामंडळाला आपल्या ५३९ बसफेऱ्या   रद्द कराव्या लागल्या. नागपूर विभागात ३० लाखांचा फटका बसला. बससेवा सुरू असताना आंदोलकांनी ३ बसेसची तोडफोड केल्याच्या घटना कामठी, गंगाबाई घाट आणि वानाडोंगरी परिसरात घडल्या. बससेवा बंद झाल्यामुळे अनेक प्रवाशांना बसस्थानकावर येऊन परत जाण्याची पाळी आली.

आॅनलाईन लोकमत नागपूर : बंदमुळे एसटी महामंडळाला आपल्या ५३९ बसफेऱ्या   रद्द कराव्या लागल्या. नागपूर विभागात ३० लाखांचा फटका बसला. बससेवा सुरू असताना आंदोलकांनी ३ बसेसची तोडफोड केल्याच्या घटना कामठी, गंगाबाई घाट आणि वानाडोंगरी परिसरात घडल्या. बससेवा बंद झाल्यामुळे अनेक प्रवाशांना बसस्थानकावर येऊन परत जाण्याची पाळी आली. महाराष्ट्र बंद असल्यामुळे पोलिसांच्या संपर्कात राहूनच बससेवा सुरु ठेवण्याचे आदेश मुंबई मुख्यालयाने एसटीच्या विभाग नियंत्रक कार्यालयाला देण्यात आले होते. त्यानुसार सकाळी ८ वाजेपर्यंत एसटी महामंडळाच्या फेºया नियमित सोडण्यात आल्या. नागपूर विभागात गणेशपेठ, घाट रोड, इमामवाडा, वर्धमाननगर, उमरेड, काटोल, रामटेक, सावनेर हे आठ डेपो आहेत. या आठही डेपोतून दिवसाकाठी ११४० बसफेऱ्या   सोडण्यात येतात. परंतु बंदमुळे यातील ६०१ फेऱ्याच आगाराच्या बाहेर गेल्या. ५३९ फेऱ्या   रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाला घ्यावा लागला. यात महामंडळाला विभागात ३० लाखाचा फटका बसल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. सकाळी आगाराबाहेर गेलेल्या तीन बसेसची तोडफोड आंदोलकांनी केली. यात तुमसर आगाराची एम. एच. २०, डी-९३१९ ही बस गंगाबाई घाटाजवळ, घाट रोड आगाराची एम. एच. ४०, एन-८२०७ क्रमांकाची बस वानाडोंगरीच्या राजीवनगर भागात आणि ८१० क्रमांकाची बस कामठी येथे फोडण्यात आली. बसची तोडफोड झाल्यामुळे दुपारी एसटीने आपल्या बसेसची वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेतला. बंद असल्यामुळे बहुतांश प्रवाशांनी आपला प्रवासाचा बेत आधीच रद्द केलेला होता. काही तुरळक प्रवाशी गणेशपेठ बसस्थानकावर आले होते. परंतु बसेस बंद असल्यामुळे त्यांना आल्यापावली परत जाण्याची पाळी आली.

संबंधित

काेरेगाव भीमा असणार सीसीटिव्ही निगराणीखाली ; पाेलीस करणारा छुप्या कॅमेरांचा वापर
कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी प्रशासन सज्ज; पाच हजार पोलिसांचा असणार बंदोबस्त
चंद्रशेखर आझाद यांची त्वरित सुटका करा - अविनाश महातेकर 
भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद नजरकैदेत ?
कोरेगाव-भीमा हे आमच्यासाठी तीर्थस्थळ, ठरल्याप्रमाणे सभा घेणारचः चंद्रशेखर आझाद

नागपूर कडून आणखी

अल्पवयीन मुलीवर शौचालयात अत्याचार
फायर आॅडिट नसलेल्या इमारतींना मनपाची नोटीस
आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन बाळगा
कोळसा चोरीत पोलीस व वेकोलि अधिकाऱ्यांचाच हात
उन्हाळ्याआधीच वरोऱ्यात पाणी प्रश्न पेटला

आणखी वाचा