नागपुरात ड्रग्स माफिया आबू खानला फिल्मीस्टाईल अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 10:42 PM2019-01-08T22:42:04+5:302019-01-08T22:43:14+5:30

गोवा, मुंबईसह देशातील विविध भागातील ड्रगमाफियांच्या नेटवर्कचा हिस्सा असलेला विदर्भातील प्रमुख ड्रगमाफिया आबू फिरोज खान याला गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी फिल्मीस्टाईल अटक केली. आबूच्या अटकेमुळे ड्रग्स तस्करीत गुंतलेले मध्यभारतातील अनेक मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Drugs Mafia Abu Khan in Nagpur filmstyle arrested |  नागपुरात ड्रग्स माफिया आबू खानला फिल्मीस्टाईल अटक

 नागपुरात ड्रग्स माफिया आबू खानला फिल्मीस्टाईल अटक

Next
ठळक मुद्देदेशातील अनेक ड्रगमाफियांसोबत संबंध : ड्रग्स तस्करीच्या नेटवर्कचा खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोवा, मुंबईसह देशातील विविध भागातील ड्रगमाफियांच्या नेटवर्कचा हिस्सा असलेला विदर्भातील प्रमुख ड्रगमाफिया आबू फिरोज खान याला गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी फिल्मीस्टाईल अटक केली. आबूच्या अटकेमुळे ड्रग्स तस्करीत गुंतलेले मध्यभारतातील अनेक मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गोवा, मुंबईसह मध्य भारतातील अनेक ड्रगमाफियांचा दुवा म्हणून आबू खान ओळखला जातो. वयाच्या अवघ्या १६व्या वर्षांपासून आबू ड्रग्स तस्करीत गुंतला आहे. विविध प्रकारच्या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीतील महत्त्वाचा सदस्य म्हणून आबूची सर्वत्र ओळख आहे. महिन्याला लाखोंची खेप इकडून तिकडे करणाऱ्या आबूकडे कोट्यवधींची मालमत्ता अन् अनेक वाहने आहेत. त्याच्यासाठी केवळ तस्करी करणारेच नव्हे तर अनेक गुन्हेगारी टोळ्यातील गुंडही काम करतात. गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने अमिर खान आतिक खान (मुंबई), मोहम्मद वकार ऊर्फ गौस मोहम्मद अनिस, जावेद ऊर्फ बच्चा अत्ताऊल्ला खान आणि अर्शद अहमद अशफाक अहमद या चौघांना चार लाखांच्या एमडी पावडर (ड्रग्स)सह अटक केली होती. ते सध्या गुन्हे शाखेच्या कोठडीत आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने आबू राहत असलेल्या मोठा ताजबाग वस्तीत छापा घातला. पोलिसांची चाहूल लागताच तो पळायला लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला सिनेस्टाईल ताब्यात घेतले.
दो से भले चार...!
२३ डिसेंबरला अमिर खान आणि मोहम्मद वकार यांना गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल राहुल डिलक्सजवळून अटक केली होती. त्यांच्याकडून २ लाख, १० हजारांचे ७० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले होते. त्यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना जावेद आणि अर्शदची नावे मिळाली होती. त्यांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून १ लाख, ७७ हजारांचे एमडी पावडर मिळाले. बच्चा हा आबूचा राईट हॅण्ड म्हणून ओळखला जातो. त्याने आबूचे अनेक पत्ते पोलिसांसमोर उघड केले. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली. आता आबूकडून एक मोठी टोळीच हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Drugs Mafia Abu Khan in Nagpur filmstyle arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.