दीक्षाभूमी : पोलीस आयुक्तांनी घेतला सुरक्षेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:54 PM2018-10-17T23:54:14+5:302018-10-17T23:56:46+5:30

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बुधवारी रात्री दीक्षाभूमीला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आवश्यक निर्देश दिले.

Dikshitbhoomi: A review of the security taken by the Commissioner of Police | दीक्षाभूमी : पोलीस आयुक्तांनी घेतला सुरक्षेचा आढावा

दीक्षाभूमी : पोलीस आयुक्तांनी घेतला सुरक्षेचा आढावा

googlenewsNext
ठळक मुद्देअडीज हजारावर पोलीस तैनात : समता सैनिक दलही मदतीला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बुधवारी रात्री दीक्षाभूमीला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आवश्यक निर्देश दिले.
दीक्षाभूमी परिसरात ठिकठिकाणी देखरेख टॉवर उभारण्यात आले आहे. तब्बल अडीज हजारावर पोलीस अधिकारी व कर्मचारी दीक्षभूमी परिसरात तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच समता सैनिक दलाचे सैनिकही सुरक्षा व्यवस्थेत मदत करतील.
वाहतुकीसाठी स्वतंत्र नियोजन
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी यावर्षी बंदोबस्ताचे वेगळे नियोजन केले आहे. दीक्षाभूमीला जोडणाऱ्या  मार्गावर वाहतुकीची कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांचे ११ अधिकारी आणि १९४ कर्मचारी दीक्षाभूमी परिसराचा स्वतंत्र वाहतूक बंदोबस्त सांभाळणार आहेत.
ड्रोनचीही घेणार मदत 
एवढ्या प्रचंड संख्येत होणारी गर्दी लक्षात घेता कुठे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ड्रोनची मदत घेतली जाणार आहे. मेगा फोन आणि ड्रोन हे यावर्षीच्या बंदोबस्तात पहिल्यांदाच वापरण्यात येणार आहे. 

Web Title: Dikshitbhoomi: A review of the security taken by the Commissioner of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.