दीक्षाभूमी : दुसऱ्या दिवशी सहा हजार अनुयायांनी घेतली दीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:38 PM2018-10-17T23:38:23+5:302018-10-17T23:39:49+5:30

बौद्ध धम्म प्रज्ञा, करुणा, समता शिकविते. या जगात सुखी आणि उत्तम जीवन जगता येण्यासाठी माणसाला याच गोष्टींची गरज आहे. म्हणूनच दरवर्षी दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्याचे आयोजन केले जाते. बुधवारी सहा हजारांवर बाबासाहेबांच्या अनुयायांना बौद्ध धम्मगुरु भदन्त नागार्जुन सुरेई ससाई यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली.

Dikshabhoomi: The next day, six thousand followers took initiation | दीक्षाभूमी : दुसऱ्या दिवशी सहा हजार अनुयायांनी घेतली दीक्षा

दीक्षाभूमी : दुसऱ्या दिवशी सहा हजार अनुयायांनी घेतली दीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देशेकडो अनुयायी बौद्ध धम्माच्या वाटेवर 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बौद्ध धम्म प्रज्ञा, करुणा, समता शिकविते. या जगात सुखी आणि उत्तम जीवन जगता येण्यासाठी माणसाला याच गोष्टींची गरज आहे. म्हणूनच दरवर्षी दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्याचे आयोजन केले जाते. बुधवारी सहा हजारांवर बाबासाहेबांच्या अनुयायांना बौद्ध धम्मगुरु भदन्त नागार्जुन सुरेई ससाई यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो बांधवांसह नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन जगात एक नवी धम्मक्रांती केली. या ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी यांच्यावतीने बौद्ध दीक्षा-विधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भदन्त सुरेई ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ५०० वर श्रामणेर व सहा हजार अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यावेळी श्रामणेर झालेल्यांना चिवर दान देण्यात आले. दीक्षा देण्याचा हा कार्यक्रम गुरुवार १८ आॅक्टोबरपर्यंत चालणार आहे. भदन्त सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली व दीक्षाभूमी स्मारक समितीचे कार्यवाह सदानंद फुलझेले यांच्या उपस्थितीत अनुयायांना दीक्षा दिली जात आहे.
प्रारंभी बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर अनुयायांना २२ प्रतिज्ञाचे वाचन करावयास लावले. श्रामणेर यांना पंचशीलचे महत्व सांगून ते आत्मसात करण्यास सांगण्यात आले. बुधवारी श्रामणेरची दीक्षा घेतलेल्यांमध्ये १० वर्षीय मुलापासून ते ५५ वर्षीय अनुयायांचा समावेश होता. धम्म दीक्षा घेण्यासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, चेन्नई, कोलकाता, मराठवाडा, नाशिक, मुंबई व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आले आहेत. दीक्षेच्या या कार्यक्रमात स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ता रवी मेंढे हे विशेष परिश्रम घेत आहेत.

Web Title: Dikshabhoomi: The next day, six thousand followers took initiation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.