धवड दाम्पत्य जामिनासाठी हायकोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:31 AM2019-07-13T00:31:53+5:302019-07-13T00:32:27+5:30

नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणात आरोपी असलेले अध्यक्ष अशोक शंकर धवड (६५) व त्यांच्या पत्नी किरण (५९) यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले आहेत. त्या अर्जांवर १६ जुलै रोजी न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे.

Dhawad couple in the High Court for bail | धवड दाम्पत्य जामिनासाठी हायकोर्टात

धवड दाम्पत्य जामिनासाठी हायकोर्टात

Next
ठळक मुद्देनवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणात आरोपी असलेले अध्यक्ष अशोक शंकर धवड (६५) व त्यांच्या पत्नी किरण (५९) यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले आहेत. त्या अर्जांवर १६ जुलै रोजी न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे.
एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने काही दिवसांपूर्वी धवड दाम्पत्यासह इतर आरोपींना अटकपूर्व जामीन नाकारला होता. त्यामुळे धवड दाम्पत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बँकेत ३८ कोटी ७५ लाख २० हजार ६४१ रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणात धंतोली पोलिसांनी १५ मे २०१९ रोजी श्रीकांत सुपे (५७) यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, १२०-ब, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७-अ यासह एमपीआयडी कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. २०१४-१५ मध्ये बँकेतून चार कोटी तीन लाख रुपयांची उचल करण्यात आली व बनावट कागदपत्राच्या आधारे ती रक्कम बँकेला परत केल्याचे दाखवण्यात आले होते. अशा विविध प्रकारे बँकेत घोटाळा करण्यात आला.

Web Title: Dhawad couple in the High Court for bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.