ठळक मुद्देउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू : ‘अ‍ॅग्रोव्हीजन’ कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाचा विकास म्हणजे केवळ शहरांची प्रगती असा होत नाही. औद्योगिक विकास आवश्यक आहेच. मात्र शेतीवरदेखील लक्ष केंद्रीत करणे तितकेच महत्त्वाचे आहे. कृषी विकासाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. शुक्रवारी रेशीमबाग मैदान येथे ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर, खा.कृपाल तुमाने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, डॉ.सी.डी.मायी, आयोजन समितीचे संयोजक गिरीश गांधी, सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर प्रामुख्याने उपस्थित होते. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. मात्र शेतकºयांच्या प्रश्नांना योग्य तसे प्राधान्य मिळाले नाही. आजच्या तारखेत शेतकºयांवर निर्यातीसंदर्भात अनेक बंधने आहेत. ही बंधने हटविण्याची आवश्यकता आहे. दीनदयाल उपाध्याय यांनी ‘हर खेत को पानी’ असे म्हटले होते. त्यानुसार धोरण तयार झाले पाहिजे, असे उपराष्ट्रपतींनी प्रतिपादन केले. शेतकºयांच्या प्रगतीसाठी केवळ शासनच जबाबदार असते असे नाही. ही प्रवृत्ती राजकारण्यांमुळे वाढली आहे. प्रगतीसाठी समाज, सरकार, बँका, तंत्रज्ञान यांच्यासह विविध क्षेत्रांतून एकत्रित प्रयत्न झाले पाहिजेत. अशा दृष्टिकोनातून शेतकरी विकसित होतील, असे उपराष्ट्रपती म्हणाले. रवी बोरटकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अमर कुलकर्णी यांनी वैयक्तिक गीत सादर केले. रेणुका देशकर यांनी संचालन केले तर रमेश मानकर यांनी आभार मानले.

तर शेतकरी कर्जमाफी मागणार नाही
यावेळी उपराष्ट्रपतींनी शेतकºयांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबींवरदेखील प्रकाश टाकला. जर पुरेसे पाणी, सिंचन, २४ तास वीज, चांगले रस्ते, बाजारपेठा आणि तंत्रज्ञानाची ओळख शेतकºयांना करून दिली तर एकही शेतकरी कर्जमाफी मागणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कर्जमाफी हे शेतकºयांच्या समस्येवरील समाधान नाही. कृषीक्षेत्रातील संशोधनदेखील वाढायला हवे. शिवाय शेतकºयांनीदेखील पारंपरिक प्रणाली व पिकांपासून थोडा वेगळा विचार करायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मराठीतून भाषणाची सुरुवात
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा नागपूरशी जुना संबंध राहिला आहे. सक्रिय राजकारणात असतानादेखील त्यांनी अनेकदा नागपूरला भेट दिली होती. शुक्रवारी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच मराठीतून करत उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय त्यांनी रटाळ भाषण न करता महत्त्वाच्या मुद्यांवर भर दिला.